मुंबई : भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव देण्यात आलं नव्हतं. अखेर महाराष्ट्राचं गूढ समोर आलं असून यामध्ये पंकजा मुंडे, रक्षा खडसे, नितीन गडकरी अशा अनेक उमेदवारांचा समावेश आहे.
नंदूरबार – डॉ. हिना गावित
धुळे – डॉ. सुभाष भामरे
जळगाव – स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
अकोला – अनूप धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
नांदेड – प्रतापराव चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे
दिंडोरी – भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – पियूष गोयल
मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
अहमदनगर – डॉ. सुजय विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजीतसिंह हिंदूराव नाईक – निंबाळकर
सांगली – संजयकाका पाटील
जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे. जळगावात भाजपने विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत.
नंदूरबारमधून हिना गावित यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. गेली दोन टर्म त्या नंदूरबारच्या खासदार आहे. पक्षाने त्यांना हॅट्रिक करण्याची संधी दिली आहे. धुळे मतदारसंघातून सुभाष भामेर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती. मात्र पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवित पुन्हा संधी दिली आहे.
बीडमधून पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे दोघींपैकी कोणाला तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा सुरू असताना पक्षाकडून पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं आहे.