मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून घटकपक्षांसह जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांसह संभाव्य उमेदवारांचेही जीवही टांगणीला लागले आहे. दरम्यान महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा आकडा सूत्रांकडून सांगण्यात आला आहे. यानुसार, महायुतीचे जागावाटपासह उमेदवारांची नावंही ठरली असल्याचं सांगितलं जात आहे. २८ मार्च, गुरुवारी म्हणजे उद्या महायुतीकडून याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एकूण लोकसभेसाठीच्या महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी…
भाजप – २८, शिंदेंची शिवसेना – १४, अजित पवार गट – ५ आणि राष्ट्रीय समाज पार्टी – १ जागांवर निवडणूक लढवू शकतात. मात्र जर मनसेला जागा देण्यात आली तर शिंदे गट किंवा भाजपमधील एक जागा कमी होऊ शकते.
शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा…
1.रामटेक
2.बुलढाणा
3.यवतमाळ-वाशिम
4.हिंगोली
5.कोल्हापुर
6.हातकणंगले
7.छत्रपती संभाजीनगर
8.मावळ
- शिर्डी
- पालघर
11.कल्याण
12.ठाणे - दक्षिण मध्य मुंबई
- उत्तर पश्चिम
अजित पवार गटाला दिलेल्या जागा..
1.रायगड
2.बारामती
3.शिरूर
4.नाशिक
5.धाराशिव
राष्ट्रीय समाज पक्ष – 1परभणी
भाजपच्या जागा
- नागपुर
2.भंडारा-गोंदिया
3.गडचिरोली-चिमूर
4. चंद्रपुर
5.अकोला
6.अमरावती
7.नांदेड
8.लातूर
9.सोलापुर
10.माढा
11.सांगली
12.सातारा
13.नंदूरबार
14.जळगाव
15.जालना
16.अहमदनगर
17.बीड
18.पुणे
19.धुळे
20.दिंडोरी
21.भिवंडी
22.उत्तर मुंबई
23.उत्तर मध्य मुंबई
24.उत्तर पूर्व मुंबई
25.दक्षिण मुंबई
26.रत्नागिरी- सिंधुदूर्ग
27.उत्तर मुंबई
28.रावेर
यापैकी भाजपने २३ जागांवर उमेदवार निश्चित केले आहेत. अद्याप उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, शिर्डी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा या जागांवरील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. मनसे जर महायुतीत सामील झाली तर शिंदे गट किंवा भाजपची दक्षिण मुंबई किंवा शिर्डी यापैकी एक सीट कमी होऊ शकते.