नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना पक्षांकडून जागावाटपासाची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपच्या उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा इंडिया आघाडीचा प्लान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोदी सरकार टीका करणारे सत्यपाल मलिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2019 साली घडलेल्या पुलवामा हल्ला प्रकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या उमेदवारांच्या फिडबॅकमध्ये हा सल्ला मिळाल्याचं सांगितलं जात आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार डॉ. राजेश मिश्रा यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत सत्यपाल मलिक हे पंतप्रधानांविरोधात उमेदवार होऊ शकतात. दुसरीकडे सपा नेता अतहर जमाल लारींनी सांगितलं की, इंडिया आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. वाराणसीतून जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल मलिक यांना पंतप्रधानांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात यावं, अशी विनंती लारींकडून काँग्रेसला करण्यात येणार आहे.
सत्यपाल मलिक यांच्या घरावर ईडीचे छापेमारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी २२ फेब्रुवारी रोजी मलिक यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती.
हे ही वाचा – पंतप्रधानांचे बौद्धिक, सत्तेनंतर 100 दिवसांचा कृती आराखडा; तिसऱ्यांदा जिंकण्यावर भाजप ठाम!