मुंबई : येत्या 15 मार्चला देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून येत्या 15 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. याच दिवसापासून देशात आचारसंहिताही लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात आणि महाराष्ट्रातील निवडणूक 4 टप्प्यात पूर्ण झाली होती. यानंतर २३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. याशिवाय ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. गेल्या लोकसभेचा विचार करता ३० मेपर्यंत सत्ता स्थापन करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचेंही १४ मार्चपर्यंतचे कार्यक्रम शेड्यूल आहेत. त्यामुळे १५ मार्चला लोकसभा निवडणुकीबाबत स्पष्टता येईल, असे सांगितले जात आहे.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान एकूण 7 टप्प्यांत या निवडणुकांमधून 17 लोकसभेमधील सर्व 543 खासदारांची निवड केली गेली होती. त्यापैकी 78 खासदार महिला आहेत.