X: @therajkaran
मुबंई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणारआहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. शाहू महाराज (Shahu Maharaj) हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) हे संभाव्य उमेदवार असतील.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी (Jalgaon Loksabha) शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धाही जागा लढवण्यासाठी आग्रही होती. मात्र, आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हर्षल माने (Harshal Mane) हे शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील, असं सांगितलं जात आहे. त्याशिवाय, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये एकमत होत आहे.