ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विश्लेषण

राजघराण्यांवरुन शरद पवार आणि भाजपात संघर्ष ? शाहू छत्रपतींनंतर आता मोहिते पाटील घराणंही भाजपापासून दूर?

मुंबई- भाजपानं २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर प्रकर्षानं राज्यातील राजघराण्यांना पक्षाशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता शरद पवार तोडण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. २०१४ विधानसभा निवडणुकांनंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर २०१९ च्या विधानसभेपर्यंत राज्यातील राजघराणी जोडण्याचा प्रयत्न केला होता. आता हीच राजघराणी पुन्हा भाजपापासून तोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींच्या उमेदवारीसाठी शरद पवारांनी धरलेला आग्रह आणि त्यानंतर आता रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात माढ्यात धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देऊन शरद पवार भाजपाला शह देताना दिसतायेत.

भाजपानं नेमकं काय केलं होतं

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर भाजपानं आपली ब्राह्मण आणि शेटजींचा पक्ष ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापुरात त्यावेळी शक्तिमान असलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभा खासदारकी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रातील मराठा समाजाची मोठी घराणी भाजपाशी जोडण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, समरजीतसिंह घाटगे, विजयसिंह मोहिते पाटील, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राणा जगजीतसिंह यासारखी मोठी नावं भाजपानं पक्षाशी जोडली.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी देण्याचा प्रयत्नही भाजपानं केला. त्यांच्यासोबत शंभूराज देसाई हेही महायुतीत आले. त्यानंतर अजित पवार महायुतीत आल्यानं रामराजे नाईक निंबाळकर यासारखी घराणीही भाजपाशी जोडली गेल्याचं मानण्यात येत होतं.

२०१९ साली लोकसभेनंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसोबत झालेल्या साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतरही उदयनराजेंना भाजपानं राज्यसभेची उमेदवारी देत छत्रपती घराण्याचा सन्मान राखला. त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक, मंडलिक ही ताकदवर घराणीही भाजपानं जोडली.

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर भाजपा आणि ठाकरे सरकारनं त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळं ते नाराज झाले आणि त्यांनी स्वराज्य नावाची वेगळी संघटना स्थापना केली.

याचबरोबर नारायण राणे, अशोक चव्हाण, अजित पवार यासारखी मराठा समाजातील मान्यवर नेतेही महायुतीसोबत जोडले गेले.

शरद पवारांनी नेमकं काय केलं?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर फडणवीस सरकारच्या काळात आंदोलनं करण्यात आली. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले. यामागे पडद्यााड कोण होतं, याचा चर्चाही रंगल्या.

त्यानंतर फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतरही मराठा समाजाकडून फडणवीस यांचं नेतृत्व मान्य होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले.

शरद पवारांनी याच्या आधी आणि नंतरच्या काळातही फडणवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री असल्याचं राज्याच्या राजकारणात ठसवण्याचा प्रयत्न केला. पुण्यात पेशवे आणि छत्रपती यांच्याबाबत त्यांनी फडणवीसांच्या कारकिर्दीत केलेलं विधान याबाबत पुरेसं बोलकं म्हणावं लागेल.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात मराठा आरक्षणाचे खरे शत्रू हे फडणवीसच असल्याचं मराठा समाजात बिंबवण्याचा प्रयत्न झाला. या मागे शरद पवारच होते, अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय.

पवारांनी आता साधली संधी

यंदाच्या लोकसभेच्या तिकीट वाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेली मराठा घराणी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न पवार करताना दिसतायेत. कोल्हापुरात शाहू छत्रपतींना लोकसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी आग्रह पवारांनीच धरल्याचं मानण्यात येतंय. त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघात रणजतीसिंह नाईक निंबाळकर यांना झालेल्या विरोधानंतर रामराजे आणि मोहिते पाटील घराण्यांनाही पुन्हा आपल्यासोबत घेण्याचा पवारांचा प्रयत्न दिसतोय.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात