ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

‘माझ्याकडे निवडणूक लढवण्याइतपत पैसे नाहीत’, काय म्हणाल्या देशाच्या अर्थमंत्री? सीतारमण यांची नेमकी संपत्ती किती?

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक लढवण्याचा भारतीय जनता पार्टीनं दिलेला प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेटाळला आहे. या प्रस्ताव फेटाळताना त्यांनी दिलेल्या कारणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी ज्या प्रकारचा पैसा लागतो, तो आपल्याकडे नाही, असं प्रांजळपणे त्यांनी सांगितलेलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सीतारमम यांना आंध्र पदेश किंवा तामिळनाडू या दोन राज्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.

काय नेमकं म्हणाल्यात सीतारमण

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा हा सगळा किस्सा सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं की , भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेल्या प्रस्ताववर सुमारे 10 दिवस आपम विचार केला. त्यानंतर निवडणूक लढणार नाही, हे नड्डा यांना सांगण्यात आलं. निवडणूक लढवण्यासाठी जितका पैसा लागतो तो आपल्यापाशी नसल्याचं यावेळी सीतारमण यांनी सांगितलं. जिंकण्यासाठी पैशांसोबतच इतरही काही मापदंड आहेत. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या जातीचे आहात, त्यामुळं हे सारं करण्याइतपत आपम सक्षम नाही, असं वाचत असल्यानं निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं सीतारमण यांनी सांगीतलं.

निधी का नाही, याला काय उत्तर?

जे पी नड्डा यांनीही सीतारमण यांनी दिलेलं कारण ऐकून त्याचा स्वीकार केला, याबाबत त्यांचे आभारही सीतारमण यांनी मानले आहेत. देशाच्या अर्थमंत्र्यांकडे पैसे नाहीत, हे कारण कसं असेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी देशाचा पैसा हा आपला पैसा नसल्याचं उत्तर दिलंय. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत ही माझी आहे, ती देशाची नाही असंही त्यांनी त्यावर सांगीतलंय.

सीतारमण यांच्याकडे किती संपत्ती

देशाच्या तिजोरीचा हिशोब ठेवणाऱ्या सीतारमण यांच्याकडे इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत कमी संपत्ती आहे. २०२३ साली केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या संपत्तीत, सर्वाधिक कमी संपत्ती ही सीतारमण यांच्याकडे असल्याचं समोर आलं होतं.

घर- १ कोटी ७० लाख ५१ हजार ४००
जमीन- ७ लाख ८ हजार ८००
स्कूटर – २८ हजार २६०
दागिने- १८ लाख ४६ हजार ९८७
बँकेत जमा- ३५ लाख ५२ हजार ६६६
पीपीएफ- १ लाख ५९ हजार ७६३
म्चुचअल फंड्स- ५ लाख ८० हजार ४२४
दिलेलं कर्ज – २ लाख ७० हजार
इतर उत्पन्न- ५ लाख ८ हजार ५३६

सीतारमण यांच्याकडे कारही नाही

विशेष म्हणजे देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारमण यांच्याकडे स्वत:ची कारही नसल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडे केवळ एक जुनी बजाज चेतकची स्कूटर असल्याची माहिती त्यांनीच त्यांच्या संपत्ती विवरणात दिली आहे.

अ्ंतर्मुख करणारी कबुली

निर्मला सीतारमण यांनी प्रांजळपणे घेतलेल्या या भूमिकेमुळं देशातील राजकारणी किती पैसे खर्च करतात, निवडणुका कोणत्या निकषांवर लढल्या जातात याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचाःहातकणंगलेच्या जागेवरुन सदाभाऊ खोत ठाम, आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे