मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे .”लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत’ “असे सांगत सीतारमण यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारत निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
त्या पुढे म्हणाल्या , लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ज्या प्रकारे पैसे खर्च केले जातात, तेवढे पुरेसे पैसे माझ्याकडे नाहीत. तसेच निवडणुकीमध्ये जात किंवा धर्माचा आधार घेतला जातो, ते मला खटकतं. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला. पक्षाध्यक्षांनीही माझ्या उत्तराशी सहमती दर्शवली असं त्या म्हणाल्या. दरम्यान त्याना तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहात आणि तुम्हीच म्हणत आहात की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे विचारले असता देशाचा निधी हा माझा नाही. माझा पगार, सेव्हिंग माझी आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले.या निवडणुकीत लढण्यासाठी त्यांनी दहा दिवसाचा वेळ घेतला आणि अखेर प्रस्ताव फेटाळून लावला . त्यांना हि निवडणूक लढण्यासाठी पक्षाच्या अध्यक्षांकडून आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवा, अशी ऑफरही देण्यात आली होती.असेही त्यांनी सांगितले .
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता सर्वच पक्षांकडून उमदेवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने (bjp )बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातवी यादी जाहीर केली. याच दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहेदेशभरात केंद्रामध्ये असलेल्या मंत्र्यांकडील संपत्ती पाहून सर्वसामान्य नागरिकांना धक्का बसतो. मात्र असून देखील इतर मंत्र्यांच्या तुलनेत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे खूप कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे सुमारे १.३४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सीतारमण आणि त्यांचे पती यांच्या नावावर असलेल्या घराची किंमत ९९.३६ लाख रुपये आहे तर बिगर शेती जमीन १६.०२ लाख रुपयांची आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचे मासिक वेतन ४,००,००० रुपये इतके आहे.