महाराष्ट्र ताज्या बातम्या

विनापरवाना तोडलेले सागवानी लाकूड जप्त; महाड वनविभागाची कारवाई

महाड तालुक्यातील किंजळोली येथे जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडासह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी

किंजळोलीत धाड; सुमारे चार घनमीटर सागवान ताब्यात, अंदाजे किंमत ₹80 हजार

महाड : महाड तालुक्यातील किंजळोली गावाच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या जागेवर विनापरवाना सागवानी वृक्षांची तोड करून लपवून ठेवलेले सुमारे चार घनमीटर लाकूड महाड वनविभागाने शुक्रवारी दुपारी कारवाई करून जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सागवानी लाकडाची अंदाजे किंमत ₹80 हजार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

किंजळोली परिसरात अवैधरित्या आणि विनापरवाना सागवान वृक्षांची तोड करून लाकूड लपवून ठेवण्यात आल्याची तक्रार महाड वनविभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी वनविभागाच्या पथकासह संबंधित ठिकाणी पाहणी केली. पाहणीदरम्यान विनापरवाना तोड करण्यात आलेले सागवानी लाकूड आढळून आले. विशेष म्हणजे, तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रमाणापेक्षाही अधिक सागवान लाकूड घटनास्थळी सापडल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागाने घटनास्थळावरील सुमारे चार घनमीटर सागवान लाकूड जप्त केले असून, त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत ₹80 हजार असल्याचे सांगण्यात आले.

जप्त केलेले सर्व सागवानी लाकूड पुढील कार्यवाहीसाठी माणगाव तालुक्यातील नाणोरे येथील वनविभागाच्या शासकीय विक्री आगारात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात वृक्षतोड केल्याचा आरोप असलेल्या संबंधित व्यक्तीला वनविभागाने नोटीस बजावली असून, लागू कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी सांगितले. “तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता विनापरवाना सागवान तोड झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा अधिक लाकूड घटनास्थळी आढळून आले. सर्व सागवान लाकूड जप्त करून नाणोरे येथील शासकीय विक्री आगारात पाठविण्यात आले आहे,” अशी माहिती वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी दिली.

या कारवाईत महाडचे वनपाल संदीप उतेकर, दापोलीचे वनपाल आदेश जाधव, रायगडचे वनपाल सुनील घोलप, नाते येथील वनरक्षक भोसले, करंजाळी येथील वनरक्षक दिलीप जंगम तसेच रायगड येथील वनरक्षक मोरे आणि तिरके यांनी सहभाग घेतला.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात