मुंबई : लोकसभा निवडणुकीचा( LokSabha Election २०२४) सातवा आणि शेवटचा टप्पा येत्या १ जूनला पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे .या शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे. या जागावर आपलाच विजय होणार असा दावा काँग्रेस(congress) आणि भाजपकडून( bjp )केला जात आहे . या जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi),यांनी प्रचाराचा धडाका उडवला असताना आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग( Manmohan Singh)यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे ..पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत, देशातील जनतेला मोदी घृणास्पद भाषण देत आहेत . त्यांनी पंतप्रधान पदाची प्त घालवली असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे .
या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या 57 संसदीय मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश (13 जागा), बिहार (8 जागा), पंजाब (13 जागा) या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. , झारखंड (3 जागा), चंदीगड (1 जागा), पश्चिम बंगाल (9 जागा), ओडिशा (6 जागा), आणि हिमाचल प्रदेश (4 जागा) या मदारसंघामध्ये मतदान होणार आहे . .सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागेल ते म्हणजे निवडणुकीच्या निकालावर. येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून यामध्ये नक्की कोणत्या पक्षाचा विजय होणार याचे चित्र स्पष्ट होईल. तसेच. देशामध्ये नेमकं कोणाचे सरकार येणार हे जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सर्वच राजकीय नेत्यांची राजकीय उत्सुकता शिगेला पोहचली आहे .
लोकसभेच्या अंतिम टप्प्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबमधील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चडवला आहे. .मोदी सरकारने देशाचे नुकसान केले असून त्यांच्यापासून आपल्याला देश वाचवायचा आहे . देशात काँग्रेसच केवळ विकास आणि प्रगतीशील भविष्य देऊ शकते. काँग्रेस सत्तेत आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण होणार आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे.मोदींच्या भाषणांवरही आक्षेप घेतला. मी या निवडणुकीतील राजकीय चर्चांकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत आहे. मोदींनी अत्यंत द्वेषपूर्ण भाषणं केली आहेत. ही भाषणं विभाजनकारी आहेत.. या पूर्वी कोणत्याच पंतप्रधानांनी अत्यंत घृणास्पद, असंसदीय आणि असभ्य शब्दांचा कधीच वापर केला नव्हता, असंही त्यांनी म्हटलं आहे .