ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजाची दिशाभूल – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant

मुंबई :

राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज (conflict between Maratha and OBC community over reservation issue) एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्रिपल इंजिन सरकार असून देखील स्पष्ट भूमिका नाही. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच (Triple Engine Government) जबाबदार असून राज्य सरकारने याप्रश्नी ठोस भुमिका मांडून मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी, अशी कानउघडणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी भाजपा सरकारची केली आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून सरकारला कोणी रोखले आहे का? असा खोचक प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. गेली दहा वर्ष केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तरी देखील मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) निर्णय का घेतला नाही? मागच्याच महिन्यात संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (special session of parliament) बोलावले होते, या विशेष अधिवेशनात ५० टक्के मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असता तर हा प्रश्न निकाली निघाला असता, असे नाना पटोले म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आता मोदी सरकारचे काऊंटडाऊन (countdown of Modi government) सुरु झाले आहे. एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे हे चुकीचे आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलेली आहे, ती योग्यच आहे, पण राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात ते कळतच नाही आणि दुसरे उपमुख्यमंत्री वेगळेच बोलतात. हे सर्व थांबवून ठोस भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

ते पुन्हा म्हणाले की, सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना (caste-wise census) करावी, तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवा या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मागणीला सर्वांनी पाठिंबा द्यावा, हे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात.

भाजपाचे सरकार तरुणांना नशेत डुबविणार

भाजपा सरकार तरुणांना ड्रग्ज व बिअर उपलब्ध करुन देऊन नशेत डुबवण्याचे पाप करत असून शिंदे सरकारने तर आता बियरच्या किमती कमी करण्यासाठी समिती नेमली आहे. उद्या हे सरकार रेशनवरही बिअर देईल, पाण्याच्या जागी बिअरच प्या, असेही धोरण आणतात की काय? असा प्रश्न आहे. भाजपाचे सरकार तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले, त्यावर बोलताना पटोले म्हणाले की,  गुजरातच्या मुंद्रा बंदरात तीन-चार वेळा कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पडकले गेले आहे. जेव्हापासून देशातील बंदरे मित्रोंना दिली गेली, तेव्हापासून देशभरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याचेही पटोले म्हणाले. 

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात