मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election) विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा (Sharad Pawar Group Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे . त्याला ‘शपथनामा’ असं नाव देण्यात आलं आहे. या शपथनाम्यातून घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत
शपथनामा प्रकाशित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थित होते. या जाहीरनाम्यात समाजाचे विविध प्रश्न समोर ठेवून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली. यामध्ये शासकीय नोकऱ्यांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत . तसेच शासकीय नोकरीमध्ये महिलांचं आरक्षण 50% ठेवण्याचा प्रयत्न करणार शिवाय अप्रेंटिसशिप करताना सक्तीचं स्टायपेंड देण्याचं कायदा करणार आणि स्पर्धा परीक्षांसाठी आकारण्यात येणार परीक्षा शुल्क बंद करणार असल्याची मोठी घोषणा केली .महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे घेण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार असल्याचे ही ते म्हणाले ,
दरम्यान पक्षाचा शपथनामा प्रसिद्ध करण्याआधी आम्ही मर्यादित जागा लढवत आहे. विविध प्रश्नांसंबधी आम्ही मांडणी केली आहे, त्याबाबत आमचे लोकं संसदेत आवाज उठवतील’ असं पक्षाध्यक्ष शरद पवार प्रकाशनाआधी म्हणाले. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना मोदी सरकारवर (modi sarkar )जोरदार टीका केली. “मागच्या 10 वर्षात हातात सत्ता असूनही त्यांनी फक्त आश्वासन देऊन मतदारांची फसवणूक केली आहे . महागाई वाढली. 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी दर आता आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं राबवली. सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला” असे आरोप जयंत पाटील यांनी केले आहे .