ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार ; बच्चू कडूंचा मात्र उमेदवारीला विरोध

मुंबई : आगामी लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीत (amravati )राजकीय घडामोडीना वेग आला आहे .भाजपकडून अमरावतीच्या (Navneet Rana )नवनीत राणा याना लोकसभेची उमदेवारी देण्यात आली आहे . भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्यांनी काल रात्री भाजपमध्ये (BJP )प्रवेश केला आहे . यावेळी उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद, अमरावतीत विजय भाजपचाच होणार आहे, असं राणा यांनी म्हटलं आहे . उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी ‘युवा स्वाभिमान पार्टी’चा राजीनामा दिला. या पक्षाचे संस्थापक रवा राणा यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.

यापुढे बोलताना त्या म्हणाल्या , पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस बावनकुळेजी हे आमच्यासोबत नेहमी आमच्या पाठीशी राहून त्यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. आमच्यासारख्या नवीन माणसाला तिकीट देणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. आमच्या अमरावतीकरांची सून लक्ष्मीच्या हाती कमळ यावं असं अमरावतीकरांचा स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम भाजपने केलं आहे, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . ते म्हणाले , नवनीत राणा या आधीपासूनच एनडीएसीबत आहे. आम्ही एनडीए सोबत आहेत. त्यांची आमची विचारधारा एक आहे. नवनीत राणा यांनी मोदीजी च्या नेतृत्वात काम केलं आता त्यांचा भाजप प्रवेश झाला. त्या 3 लाखाच्या वर मताधिक्य घेऊन विजयी होतील. बच्चू कडू यांनी विरोध व्यक्त केला, त्यांना हात जोडून विनंती करतो की सुदधा एनडीएचा घटक आहे. सगळे मिळून काम करतील. जिल्ह्याच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा, असं रवी राणा यांनी सांगितलं

दुसरीकडे नवनीत राणा यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीला प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे . ते म्हणाले , राणा याना दिलेली उमेदवारी आम्हाला मान्य नाही त्यामुळे त्यांचा प्रचार मी करणार नाही. तर त्यांचा परभव करणार, असं ते म्हणाले. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही. आता तर उमेदवारी जाहीर झालीय. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आपण सगळं व्यवस्थित करू. एकतर दुसरं कुणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येईल का यासाठी आमचं नियोजन सुरु आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात