ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत रांणाच्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार

मुंबई : लोकसभेच्या तोंडावर अमरावती (Amravati) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात ठाकरे गटाते नेते दिनेश बुब (Dinesh Bub) यांना रिंगणात उतरले आहे . त्यामुळे अमरावती मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सत्ताधारी महायुतीमधून अमरावती मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) पाठोपाठ बच्चू कडू यांनी देखील आपले दंड थोपटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रहारने रिंगणात उतरलेल्या दिनेश बाबू यांनी लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार केलाय. तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांना केली. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर दिनेश बूब यांचा दर्यापूरमधून पराभव झाला होता. सर्वच पक्षात दिनेश बूब यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत तर त्यांचं कामही सामाजिक क्षेत्रात जास्त आहे. अमरावतीतील हिंदी भाषिक मतांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. आता नवनीत रानाच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत .अमरावतीत यंदा चौरंगी लढत होणार असली तरी 2019 मध्ये कोणाचं पारडं जड होतं हे पाहणे देखील जास्त महत्वाचे ठरणार आहे .

2019 अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष नवनीत राणा विरूद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ मैदानात होते. यावेळी रिंगणात असलेल्या नवनीत राणांना 5 लाख 7 हजार 844 मतं मिळाली होती. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 70 हजार 549 मतं मिळाली होती. जवळपास 37 हजार 295 मतांच्या फरकानं नवनीत राणा विजयी झाल्या होत्या.दरम्यान आता नवनीत राणा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्या तरी त्यांना ही निवडणूक सोप्पी जाणार नाहीय. अमरावतीतून अभिजीत अडसूळ अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काँग्रेसला या मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद मिळणार आहे. तर प्रहारनंही उमेदवार दिल्यानंतर या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात