मुंबई : चिरंजीव अमोल किर्तीकर यांच्याविरोधात उभं राहणार नाही आणि वयाचं कारण देत गजानन किर्तीकर यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी चाचपणी सुरू झाली होती. आज गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तो उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र एकेकाळी जनतेची धकधक वाढवणारा हा अभिनेता यंदाच्या निवडणुकीत किती करिष्मा दाखवू शकणार हा मोठा प्रश्न आहे.
2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि भाजपचे दिग्गज नेता राम नाईक यांचा पराभव केला होता. यानंतर आपला कार्यकाळ संपल्यानंतर तो पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळला होता. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनंतर गोविंदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
२००४ च्या निवडणुकीचा संदर्भ दिला तर त्या
वर्षांमध्ये गोविंदाचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. २००२ मध्ये अखियो से गोली मारे, २००० मध्ये राणी मुखर्जीसोबतचा हद कर दी आपने, २००१ मध्ये क्योंकी मे झूठ नही बोलता, २००२ मध्ये चलो इश्क लढाये, २००१ मध्ये जोडी नंबर वन, २००३ मध्ये एक और एक ग्यारा, २००१ मध्ये अलबेला यांसारख्ये अनेक चित्रपट आले आणि हिटही झाले होते. त्यावेळी त्याचा नृत्याची अभिनयाची क्रेझ होती. मात्र यानंतर २० वर्षांचा काळ उलटला असून सध्या गोविंदाचे सांगता येईल असे चित्रपट दिसून येत नाही. काही बोटावर मोजता येईल असे चित्रपट सोडले तर गेल्या २० वर्षात त्याचे बरेच चित्रपट फ्लॉप ठरले आहे. त्यामुळे २००४ मध्ये गोविंदाचा जो करिष्मा दिसला तर २०२४ मध्ये दिसू शकेल याची शक्यता कमीच दिसते.
https://twitter.com/PTI_News/status/1773314586571116627/history
यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. गोविंदाचा शेवटचा पिक्चर फ्लॉप ठरला होता. त्याचे पिक्चर सध्या चालत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर नट घ्यायचाच होता, तर मग एखादी चालणारा नट घ्यायला हवा, अशा शब्दात या पक्षप्रवेशावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावर मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटलांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला नट आहे ना, मग अजून काय पाहिजे.