मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर पक्षांमध्ये राजकीय नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंगही होण्याच्या शक्यता आहेत . .एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) काही आमदार शरद पवार गटाच्या( sharad pawar group ) संपर्कात असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे .अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील (anil patil )भाजपात जातील असा दावा त्यांनी केला आहे . त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवारांना धक्का बसणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे .
अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे सी. आर.पाटील यांच्याकडून भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत, भाजपचे लोक म्हणतात की अजित दादांना सोडून निवडणूक लढवावी लागेल. त्यानुसर पहिला प्रयोग मंत्री अनिल पाटील करत आहेत. अजित दादांना सोडणारा पहिला कोणी माणूस असेल तर तो अनिल पाटील असणार असे त्यांनी म्हंटले आहे .तसेच त्यांच्या गटातील चार ते पाच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता त्याच्याच गटातील मंत्री भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे .
राष्ट्रवादीशी बंड करून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या महायुती सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र त्याच्या या बदललेल्या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत नाराजी पसरली.मात्र आता अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर काढा अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी (NCP MLA) आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.