ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते : सुनील तटकरे

Twitter : @therajkaran

मुंबई

पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो. पण आज राज्यात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण चव्हाणच आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोटही सुनिल तटकरे यांनी आज केला.

मराठा आरक्षण (Maratha reservation) राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे उच्च न्यायालयात (High Court) टिकले नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चव्हाण यांचीवर तोंडूसख घेताना गडे मुडदे उखाडले आहेत. तटकरे म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीत (2014 Assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या जागांवर कॉंग्रेसने (Congress) परस्पर उमेदवार जाहीर केले. मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा हव्यात याची माहिती काढून घेतली आणि कॉँग्रेसचे उमेदवार त्या जागांवर उभे केले.”

तटकरे पुढे म्हणाले, आतापर्यंतचा प्रघात असा आहे की निवडणूकपूर्व दोन राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते, त्यानंतर उमेदवार यादी घोषित केली जाते. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, त्यामुळेच निवडणूक पूर्व युती (Pre election alliance) होऊ शकली नाही. त्यानंतर मी, प्रफुल पटेल व अजित पवार यांनी राजभवनावर (Raj Bhavan) जाऊन निवडणूका सोबत लढणार नसल्याचे सांगितले. परंतु, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे सत्तेला चिकटून राहण्याला अर्थ नव्हता, म्हणून आम्ही शिर्षस्थ नेतृत्वाकडे चर्चा करून सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज कॉंग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण पृथ्वीराज चव्हाण आहेत असा हल्लाबोलही सुनिल तटकरे यांनी केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे