
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्राचा आज दुसरा दिवस आहे.

राहुल गांधींनी मणिपूरच्या इंफाल पश्चिमेपासून प्रवासाला सुरुवात केली आहे.

मणिपूरमध्ये स्थानिकांनी राहुल गांधींचं भव्य स्वागत केलं.

यादरम्यान कलाकारांनी मणिपूरचं पारंपरिक नृत्य सादर केलं, यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक घोषणाबाजी करीत होते.

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्राची घोषणा करून पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ही न्याय यात्रा २० मार्चपर्यंत सुरू राहिल आणि १५ राज्यातून तब्बल ६७०० किलोमीटरपर्यंत प्रवास करेल.