ताज्या बातम्या महाराष्ट्र

“…. आमची सत्ता येणार तेव्हा राणे तिहार जेलमध्ये असणार ” ; संजय राऊत यांचा टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यातील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे . काही दिवसांपूर्वी मंत्री राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असा दावा केला होता. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी राणेंना टोला लगावला आहे . ते म्हणाले , दोन महिन्यात आमची सत्ता येणार आहे. तेव्हा नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान आजपासून पुढील तीन दिवस खासदार संजय राऊत हे तीन दिवस सांगली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सांगलीत पोहचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर भाष्य करताना म्हटले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळतं आहे आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागलं पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे आम्ही त्याचं काम करू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे .दरम्यान आमची सत्ता आल्यानंतर नारायण राणे यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यांनी ते तिहार जेलमध्ये असतील, असा इशारा संजय राऊत यांनी राणे यांना दिला आहे.

तर दुसरीकडे ‘आपली सत्ता आल्यावर राणे साहेबांना तिहार जेलमध्ये घालण्याची भाषा करणाऱ्या मुंजेरी लाल के हसीन सपने पाहणाऱ्या संजय राऊत यांनी राणे साहेब आणि भाजपच्या नेत्यांची चिंता करू नये कारण पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार आणि मोदी पंतप्रधान होत आहेत’, असे म्हणत नितेश राणेंनी हल्लाबोल केला होता दरम्यान दुसरीकडे.महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवत आहोत. महायुती म्हणून आमच्यात योग्य समन्वय आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात