मुंबई :शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)गोरगरीब,शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांसाठी बुलढाणा लोकसभेच्या (Buldhana LokSabha) रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत . येत्या २ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातगावमध्ये त्यांनी निर्धार मेळाव्यात याची घोषणा केली होती. रविकांत तुपकर यांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. नवीन चेहऱ्याच्या लोकं शोधात आहेत. लोकांनीच माझ्यासाठी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे. एका बाजूला हजारो कोटींचा मालक आणि दुसऱ्या बाजूला फाटक्या शेतकऱ्याचे लेकरू, अशी निवडणूक होणार आहे.’सामान्य जनतेनेच माझ्यासाठी आघाडी घेतली आहे. लोक खर्च करत असून वर्गणी जमा करत आहेत. समोर कुणीही उमेदवार असू द्या, मात्र लोकांनी ठरविले की शेतकऱ्यांसाठी तुपकरला सभागृहात पाठवायचे. माझ्यासमोर कुणीही उमेदवार असेल तर लढत ही रविकांत तुपकर यांचेशीच असेल. माझ्या उमेदवारीमुळे मतदानाची टक्केवारी वाढेल असा ठाम विश्वास तुपकरांनी व्यक्त केला आहे . खामगाव ते जालना रेल्वे मार्ग आम्ही लहान पणापासून ऐकतो, मात्र झाला नाही. विद्यमान खासदार बद्दल लोक नाराज आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल. निवडणूक आली की ते फक्त नारळ फोडतात. ताजमहालचे ही नारळ फोडतील. सगळ्यांची मते खाणार आणि फाईट माझ्याशीच आहे, काळया दगडावरील रेष आहे. हा विजय माझा नसेल पण गाव गाड्यातल्या लोकांचा असेल. विजय झाला तर सर्व सामान्य जनतेचा विजय असेल.’असे ही ते म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी गेल्या 20 वर्षांपासून संघर्ष करत आहे. ‘मी फाटका माणूस असून माझ्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे दोन नंबरचे पैसे नाहीत असे तुपकर म्हणाले. ‘एक व्होट आणि एक नोट’ (ek vote and ek note )या तत्त्वावर येणाऱ्या लोकसभा निवडणूकीला सामोरं जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.