मुंबई
22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोमात सुरू आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो लोक अयोध्येत एकत्र येणार आहेत. दरम्यान या सोहळ्याला उबाठा गटाचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेऊ असे म्हटले.
मात्र विश्व हिंदू परिषदेकडून दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, अयोध्येतील सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
रामजन्मभूमी मंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेकडे देशभरातील व्हिआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्याची जबाबदारी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे, शरद पवार याशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितले.