ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला शरद पवारच जबाबदार ; दिलीप मोहिते पाटलांची टीका

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी काँग्रेसचा आणि नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या शिरूर (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha constituency) ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असा सामना रंगणार आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil )यांनी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना थेट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे . आताच्या परिस्थितीत कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला त्यांनी शरद पवारांना जबाबदार धरलं. ते केंद्रीय कृषी मंत्री असताना पवारांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी टीका मोहितें पाटलांनी केली आहे .त्यांच्या या टीकेला आता डॉ. अमोल कोल्हे त्यांना काय प्रतित्युत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) तर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) यांच्यात सामना रंगणार आहे . याआधी शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हें यांनी दिलीप मोहिते पाटलांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने त्याच्या ताटात माती कालवली त्याला गद्दारी म्हणतात.दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगारी या देशात केली त्याला गद्दारी म्हणतात, असंही ते म्हणाले. यावरून त्यांनी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधत शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असतील तर शेतकरी चांगलाच सुखावला असता असे म्हणत टोला लगावला आहे . शेतकऱ्यांच्या अवस्थेला शरद पवारच जबाबदार असलयाचे त्यांनी म्हंटल आहे .

दरम्यान याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कृषिमंत्री असताना काय काय केलं याचा लेखाजोखा मांडला होता . त्यांत शेती व शेतीशी निगडीत इतर उत्पादनांकडे लक्ष देऊन शरद पवार साहेबांनी विशेष योजना राबवल्या. जेणेकरून या उत्पादनात देश अग्रेसर झाला आणि आयात करणारा देश पवार साहेबांमुळे निर्यातदार बनला असे म्हंटले . तसेच, पूर्व भारतातील शेतक-यांना भात पीक उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचं कामही शरद पवार साहेबांनी केले. यासाठी विविध महत्वाकांक्षी योजना राबवल्या.परिणामी मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन झाले. शरद पवार साहेबांनी पूर्व भारतात हरितक्रांती आणून संपूर्ण देशातील दुसरी हरितक्रांती यशस्वी करून दाखवली असेही राष्ट्रवादीने म्हटले होते .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात