X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई ईशान्य, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली आणि जळगाव, रावेर या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर महिन्यामध्ये १८ ते १९ या दोन दिवसांमध्ये १५ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला होता. त्यामध्ये अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी, चिपळूण, शाहापूर आणि जालना, कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला होता.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार श्रीनिवास पाटील, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार तथा कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मुंबई विभाग अध्यक्षा राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख इतर मान्यवर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Also Read: फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांठी निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार