ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात शरद पवारांच बळ वाढलं ; संजय क्षीरसागरांचा भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना माढ्यात (Madha Lok Sabha Election) राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) बंडखोरांसह भाजपविरोधात लढण्यासाठी स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी आपली ताकद वाढवत भाजपला मोठा धक्का दिला आहे . मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढलेले संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) प्रवेश केला आहे . त्यामुळे माढ्यात शरद पवारांचं बळ वाढलं आहे . त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (bjp ) मोठा धक्का बसला आहे

भाजपने महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला सामील करून घेतल्यानंतर भाजपचे वर्षानुवर्षे काम करणारे सर्व ताकदवान धनगर नेते बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. गेली 26 वर्षे ज्या पक्षासाठी एक एक कार्यकर्ता जोडून मोठी व्होट बँक तयार केली तोच पक्ष सोडून जाताना धनगर नेते संजय क्षीरसागर यांचे डोळे पाणावले होते.तरुण वयात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी , गोपीनाथ मुंढे अशा नेत्यांच्या विचाराने भारावून काम केलेल्या संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे रोपटे लावले, त्याला मोठे केले. मात्र पक्षातील दोन नेत्यांनी फडणवीस यांचे कान भरल्याने त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत भावनिक झालेल्या संजय क्षीरसागर यांनी आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले.दरम्यान याआधी शिवाजी कांबळे यांनी माढा तालुक्यातून अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यामुळे भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. नंतर माळशिरस तालुक्यातून उत्तम जानकर यांनीही भाजपच्या धोरणावर सडकून टीका करत शरद पवार गटात प्रवेश केला . भाजपवर असलेली नाराजी यामुळे आता बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत . त्यामुळे आता शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे .

दरम्यान याआधी करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनीही अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे यांच्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केला. यात संजय क्षीरसागर यांचे नाव मात्र भाजपासाठी मोठा धक्का मनाला जात आहे . क्षीरसागर कुटुंब अनेक वर्षांपासून भाजप वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते .. मात्र आता भाजपच्या धोरणामुळे हे सर्व बडे नेते भाजप सोडून जात असताना आपले निष्ठावंत नेते का पक्ष सोडत आहेत याची साधी विचारपूस देखील करण्यास वेळ नसल्याचा आरोप या नेत्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यात आता माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ या चार तालुक्यात नव्याने पक्ष उभारणी करण्याची वेळ भाजपवर येणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात