मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत लोकसभा (Baramati Loksabha )मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आमनेसामने आहेत. त्यावरून सुरु झालेल्या वादानं आता वेगळ वळण घेतलं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक या केलेल्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे .आता यावरून शरद पवारांनी युटर्न घेतला आहे . आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे . तसेच आपण तसं वक्तव्य केलंच नव्हतं, असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आपल्या सुनेबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही टीका केली . त्या म्हणाल्या , राज्याला पहिले महिला धोरण दिले. अनेक महिला कार्यकर्त्यांना राज्यात नेतृत्वाची संधी दिली. परंतु, त्यांचे हे विधान अतिशय क्लेषदायक आहे. गेली अनेक दशके काम करणारे शरद पवार आणि कालचे वक्तव्य करणारे शरद पवार हे एकच आहेत का, असा प्रश्न पडू लागला आहे. लग्न करून सासरी आलेली मुलगी त्यालाच आपले घर मानते. परंतु, पवारांनी हा भेद करून चुकीचा पायंडा पाडला आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली . त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर आज शरद पवार यांनी युटर्न घेत आपण तसं काहीच बोललो नसल्याचं स्पष्टीकरण दिल आहे . ते म्हणाले ,अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं.त्यातल्या भाषणावर मी बोललोय . त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले , या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारा मी राज्यातला पहिला मुख्यमंत्री होतो. शासकीय सेवेत आरक्षणाचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय हा माझा होता. असे अनेक निर्णय आहेत, ज्या निर्णयांमध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याचा काळजी मी घेतली. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सार्थ करण्यासाठी, त्याचा पाठपुरावा केला”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.