मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात चंद्रहार पाटील (chandrahar patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील (vishal patil) नाराज झाले . मात्र तरीही ते या मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत . यासाठी आता या मतदारसंघातुन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .तसेच उद्या ते सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार असलायची माहिती समोर आली आहे . त्यामुळे आता या मतदारसंघात शिवसेनेसह महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे
या सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीने सांगली मतदारसंघ शिवसेनेला (Shiv Sena) सोडला आहे. मात्र, काँग्रेसने त्यावरील दावा अद्याप सोडलेला नाही. सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी, भाजपचा (BJP) पराभव हे मुख्य लक्ष्य ठेवावे आणि काँग्रेसला उमेदवारी द्यावी, अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे. दरम्यान उद्या विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेसतर्फेही अर्ज दाखल करतील. येथील गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून सकाळी साडेनऊ वाजता पदयात्रा सुरू होईल. काँग्रेस कमिटीसमोर मेळाव्यात रूपांतर होईल. त्यानंतर मोजके लोक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .
ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सांगलीवरुन गेल्या 15 दिवसांपासून घमासान सुरु होते.पण ठाकरेंनी माघार घेतलीच नाही उलट काँग्रेसलाच दोन पावलं माघारी यावं लागलं.मोठा राजकीय वारसा पाठिशी असतानाही विशाल पाटलांना आपली तलवार म्यान करावी लागली होती . मात्र आता विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फे देखील एक अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीत बदल झालाच नाही, तर पर्याय म्हणून ते अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल करतील. काँग्रेसच्या निर्णयावर बंडखोरीबाबतचा निर्णय अवलंबून असेल. त्याविषयी २२ एप्रिलच्या आधी निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे .