X: @therajkaran
शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray) गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (Eow Inquiry) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भात चौकशी सुरू केली असून या चौकशीसाठीच अनिल देसाई यांना समन्स बजावल आहे. त्यांना आज चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष कोणाचा, यावरुन कायदेशीर वाद निर्माण झाला होता. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्येंत पोहचला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष (Shivsena) असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी अनिल देसाई यांनी तत्परतेने शिवसेना पक्षाच्या बँक खात्यामधील 50 कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली, असा आरोप शिंदे गटाने केला आहे.
शिंदे गटाने याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे (Eow ) तक्रार दाखल केली. त्यामुळे आता चौकशीसाठी त्यांना हजर राहावं लागणार आहे. रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आणखी एक मोहरा तपास यंत्रणेच्या रडारवर आला आहे.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) कोकणातील आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी त्यांना एसीबीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारी राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या कुटुंबियांनी एसीबी कार्यालयात हजेरी लावली होती.