ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी स्वामी शांतिगिरी महाराज काशीत जाणार !

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे राज्यातील सर्व उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहे. मात्र दुसरीकडे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील मतदान अजून बाकी आहे . या मतदारसंघात १ जूनला मतदान होणार आहे . यासाठी महायुतीविरोधात लढणारे उमेदवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रचारासाठी वाराणसीमध्ये (Varanasi) जाणार आहेत. या मतदार संघातून स्वामी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याविरोधात नाशिकमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. मात्र ते आता ते आता नरेंद्र मोदी यांचा काशीत जाऊन प्रचार करणार आहेत. त्यामुळे शांतिगिरी महाराज भाजपच्या वाटेवर जाणार का या चर्चाना उधाण आलं आहे .

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. परंतु महायुतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.आता ते वाराणसीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणार आहेत . मोदी हे आपले राजकारणातले आदर्श आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रचाराला वाराणसीला जाणार असल्याचे त्यांनी सांगिलते आहे . तसेच नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचचा आपला स्वतःचा निर्णय होतो. परंतु देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. यामुळे आपण काशीत जाऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी म्हटले आहे.

या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश शांतिगिरी महाराज प्रवेश करतील यावर त्यांनी सध्या काहीही सांगण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान याआधी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. या सभेच्या वेळी शांतिगिरी महाराज यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यावेळी नरेंद्र मोदी आणि शांतीगिरी महाराज यांची भेट झाली नव्हती. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी विविध माध्यमातून प्रचार केला. ग्रामीण भागात थेट बैलगाडीतून त्यांनी प्रचार केला होता.आता वाराणसीतून ते प्रचार करणार आहेत

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे