ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामती मतदारसंघात अजित पवारांची खेळी ; सुप्रिया सुळेंविरुद्ध रिंगणात उतरणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये शरद पवार गटांकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (supriya sule )यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (sunetra pawar )यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नणंद-भावजय लढाईत कुणाला कौल मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत नणंद विरूद्ध भावजय नव्हे तर बहीण Vs भाऊ अशी लढत? अजित पवारही अर्ज भरणार?

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत नणंद विरूद्ध भावजय यांच्यामध्ये संघर्ष सुरू असताना आता हीच लढाई भाऊ विरूद्ध बहीण अशी होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवार बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या मुंबई

अजित पवारांनी बहिणीला दिलेल्या शब्दाचं काय झालं, रोहित पवारांचा खोचक सवाल

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आहे. य़ासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून प्रचार जोरदार सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असल्यानं कौटुंबीक मद्देही प्रचारात येताना दजितायेत. शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवार यांना खोचक सवाल विचारलेला आहे. अजित पवार म्हणजेच भावानं शब्द दिला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते 14 वर्षांनंतर एकत्र, आज अकलूजमध्ये ‘डिनर डिप्लोमसी’

अकलूज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पावर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे तिन्ही नेते अकलूज येथे एकत्र येणार असून यावेळी माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. तब्बल १४ वर्षांनंतर पवार, शिंदे, मोहिते एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी शरद पवार, सुशीलकुमार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीतील नणंद भावजय संघर्षाला आता सून-लेकीचं रूप, शरद पवारांच्या विधानावरुन विरोधकांकडून घेराव!

बारामती : आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद-भावजयीमधील संघर्षाला शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर वेगळंच वळण लागलं आहे. आता हा वाद सून विरूद्ध लेक असं झाल्याचं दिसत आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. पुरोगामी विचारांचे आणि कधीच मुलगा-मुलगीमध्ये भेद न करणाऱ्या शरद पवारांना ४० वर्षे त्यांच्या घरात नांदणारी मुलगी घरातली वाटत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे करणार पवारांचा प्रचार; सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावरुन चर्चेला उधाण

बारामती : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते महायुतीचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो दिसल्याने अनेक पश्न उपस्थित केले जात आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’ वंचित बहुजन आघाडी काय करेतय आरोप?, किती आहे तथ्य?

मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. […]

जिल्हे महाराष्ट्र मुंबई

नाशिकचा महायुतीचा तिढा कायम, भुजबळांना भाजपाच्या कमळावर लढवण्याचा आग्रह कशासाठी?

मुंबई- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा तिढा अद्यापही कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंगातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन बराच काळ लोटला तरी नाशिक लोकसभा महायुतीतून कोण लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. शिंदेंची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष या मतदारसंघावर दावा करतायेत. साताऱ्याची जागा उदयनराजेंना सोडण्याची तयारी अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छगन भुजबळ यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव?

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर नाराज असल्याकारणाने छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. इतर मतदारसंघामधील ओबीसी मते भाजपकडे वळविण्यासाठी ही खेळ उपयोगी ठरेल, असा अंदाज भाजपकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा तिढा वाढलेला दिसून येत आहे. नाशिक मतदारसंघात दोन […]