बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आहे. य़ासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून प्रचार जोरदार सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असल्यानं कौटुंबीक मद्देही प्रचारात येताना दजितायेत. शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवार यांना खोचक सवाल विचारलेला आहे. अजित पवार म्हणजेच भावानं शब्द दिला होता राजकीय यंत्रणा मी बघतो, तू म्हणजेच सुप्रिया सुळेंनी तिकडे प्रश्न मांडायचे आणि काम करून घ्यायचं ते पाहा, असं ठरलं होतं असं रोहित पवार म्हणालेत. तुमच्या घरात राखी पौर्णिमा होते का आमच्या घरात होते. असंही रोहित पवार म्हणालेते भावानं बहिणीला शब्द दिला तर तो पाळायचा असतो. भावाने शब्द दिला होता राजकीय यंत्रणा मी बघतो आणि भावाने जर वेगळी भूमिका घेतली तर ताई चुकली आहे का?, असा सवाल त्यांनी मतदारांना विचारलेला आहे..
सुप्रिया सुळेंच्या संसदेतील भाषणांवर अजित पवारांची टीका
सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळालेला आहे. अजित पवार आणि त्यांच्या पक्षाकडून सातत्यानं या मुद्द्यावर टीका करण्यात येतेय. सुप्रिया सुळे यांना मतदारसंघआतील प्रश्न माहीत नाहीत, केवळ संसदेत त्या भाषणं करतात, अशी टीका अजित पवार सातत्यानं करताना दिसतायेत. केवळ संसदेत प्रश्न मांडून आणि सोशल मीडियावर पोल्ट टाकून प्रश्न सुटत नसल्याची टोलेबाजीही करण्यात येतेय. त्यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिल्याचं मानण्यात येतंय.
अहंकारामुळं भाजपाचं वाटोळं- रोहित पवार
यावेळी रोहित पवार यांनी भाजपावरही जोरदार टीका केली आहे. जर भाजपच खऱ्या अर्थाने ताकत असती तर ते लोकांच्या मागे असते का? असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. भाजपाची ताकद असती तर त्यांना पक्ष फोडायला लागले असते का, असंही रोहित पवार मतदारांना विचरतायेत. भाजपामध्ये अहंकार मोठ्या प्रमाणात आहे, त्यातूनच त्यांचं वाटोळं झालेलं असल्याची टीकाही रोहित पवारांनी केलीय.,