ताज्या बातम्या महाराष्ट्र

बीडमधून पंकजा मुंडेंचा गेम होणार? काय असेल शरद पवारांचा राजकीय डाव?

बीड : भाजपकडून बीड (Beed Lok Sabha Election) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. प्रथमदर्शनी बीडची निवडणूक पंकजा मुंडे एकहाती काढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. धनंजय मुंडेही महायुतीत आल्याने त्यांना तिथून विरोध होणार नाही असंच दर्शवलं जात होतं. मात्र शरद […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महायुतीचा मास्टरप्लॅन ; शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता बीडच्या जय शिवसंग्राम पक्षातही फूट

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे . शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता बीडमधील विनायक मेटे (Vinayak Mete)यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम (Shiv Sangram)संघटनेत देखील फूट पडणार आहे . त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. आता या लोकसभेसाठी एकजण महाविकास […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, आशीर्वादाचं काय?’ उमेदवारीनंतरही पंकजा मुंडेंची अस्वस्थता कायम?

बीड – बीडची भाजपाची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा राजकीय वनवास संपला, असं मानण्यात येत होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या वक्तव्यांनी पंकजा मुंडेंची अस्वस्थता अद्यापही कायम आहे की काय, असा सवाल निर्माण झालाय. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे, नगर, पाथर्डी यामार्गे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचं काय?

मुंबई- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा २०१९ पासूनचा सुरु असलेला राजकीय वनवास अखेर संपला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना खासदारकीचं तिकिट मात्र नाकारण्यात आल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास त्यांची पुढची कारकिर्द आता दिल्लीत दिसण्याची शक्यता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीडमध्ये शरद पवारांना धक्का : शेकडो कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त होणार प्रवेश

X: @therajkaran राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यापासून अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) गटाला सोडचिट्ठी दिली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. आता बीडमध्ये (Beed News) शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बीडमधील  अनेक कार्यकर्त्यांचा आज अजित पवार गटात प्रवेश होणार आहे.  बीड नगरपरिषदेचे माजी सभापती अमर […]

जिल्हे ताज्या बातम्या

पंच्याऐशी कोटीचे बेकायदा उत्खनन आणि कर थकला तरी प्रशासन गप्प

बीड: बीड जिल्ह्यात परवानगी नसताना खडी क्रेशर आणि खदानीतून उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. प्राप्त माहितीनुसार या लोकांकडे 85 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याऐवजी त्यांचे लाड संगणमत आणि पुरवले जात असल्याचे यावरून दिसते. तर दुसरीकडे या सर्व क्रशर आणि खदान धारकांचे वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश दिल्यानंतर ते कट केले गेले, परंतु त्यानंतरही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

15 दिवसात राज्याच्या राजकारण मोठे भूकंप होणार, भाजप नेत्याचे संकेत

मुंबई आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि काँग्रेसला धक्का बसला. तब्बल ५५ वर्षांपासूनचं काँग्रेससोबतच्या नात्याचा असा शेवट झाला. याबद्दल बोलताना मिलिंद देवराही भावुक झाले होते. दरम्यान भाजप मंत्र्यांनी राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची संकेत दिले आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसात आणखी कोण महायुतीचा हात धरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना धक्का, कर्जाची रक्कम न भरल्याने वैद्यनाथ कारखाना विक्रीस, 25 जानेवारीला लिलाव

बीड भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. २०३ कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी युनियन बँकेने या कारखान्याचा लिलाव करण्याचं ठरवलं आहे. या महिन्यात २५ तारखेला ई-लिलाव होणार आहे. काही महिन्यांपूर्वी १९ कोटींच्या थकित करापोटी जीएसटी विभागानेही या कारखान्यावर कारवाई […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मागास आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील पावणेतीन लाख कुटुंबांचं सर्वेक्षण

बीड राज्य मागास आयोगाला मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम दिलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्य मागास आयोगाकडून बीड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी ३ हजार ४७९ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली असून पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर!

पुणे कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली. या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे […]