मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे . शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता बीडमधील विनायक मेटे (Vinayak Mete)यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम (Shiv Sangram)संघटनेत देखील फूट पडणार आहे . त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. आता या लोकसभेसाठी एकजण महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) आणि दुसरं महायुतीसोबत (Mahayuti) जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मेटे कुटूंबात देखील फूट पडण्याची शक्यता आहे .
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा (Resignation From Government Job) दिला असून त्या आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे .तसं झालं तर दुसरीकडे विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या लहान भावाची जय शिवसंग्राम ही संघटना येत दोन ते तीन दिवसांत महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहभागा संदर्भातला निर्णय 48 तासात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बीड जिल्ह्यात मेटे विरुद्ध मेटे असा वाद पाहायला मिळणार आहे . या मेटे कुटूंबियात फूट पाडण्याचा मास्टर प्लॅन महायुतीचा यशस्वी होतो का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे . .
दरम्यान लोकसभेसाठी भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास विनायक मेटे यांचा मराठा समाजासाठी केलेला लढा पाहता ज्योती मेटे यांना मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत फायदा होऊ शकते. तसेच, विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांना सहानुभूती देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटे कुटुंबातील सदस्य आपल्या बाजूने करून महायुतीने ‘मास्टर स्ट्रोक’ मारण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता याबाबत रामहरी मेटे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .