ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विजयसिंहांसह धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, उद्या माढ्यातून भरणार उमेदवारी अर्ज

अकलूज- भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयंत पाटील आणि हजारो समर्थकांच्या उपस्थइतीत अकलूजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचाही पक्षात प्रवेश केल्याचं जाहीर केलंय. या प्रवेशामुळं माढ्यातील रणजीतसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ही लढत निश्चित झालीय. सोलापूर आणि माढा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद असलेलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये 600 कोटींचा गैरव्यवहार’, संजय राऊत यांचं थेट पंतप्रधानांना पत्र, काय आहे प्रकरण?

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसतोय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकतडे करण्यात आलेली आहे. याबाबतचं पत्र संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंची आज मनसे नेत्यांसोबत बैठक, महायुतीच्या प्रचारासाठी समन्वय समितीची घोषणा करणार?

मुंबई : गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते महायुतीच्या प्रचाराला मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर एक बैठक घेऊन मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यापुढील कामासाठी राज ठाकरे आज मनसे नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक नाही; अकलूजमध्ये शरद पवारांची जहरी टीका

अकलूज : विरोधी पक्षाचा एकही माणूस निवडून येऊ देऊ नका, याचा अर्थ रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक उरलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर जहरी टीका केली. याशिवाय शरद पवारांनी भाजपच्या 400 पार या घोषणेची खिल्ली उडवली. भाजपने 400 पारऐवजी 543 पार असा नारा दिला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले. मोदी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत मनोज तिवारी Vs कन्हैया कुमार यांची लढत महत्त्वपूर्ण का आहे?

नवी दिल्ली : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेसने दिल्लीतील सर्व तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या तिघांपैकी कन्हैया कुमार हे नाव अधिक चर्चिलं जात आहे. कन्हैया कुमार आता सिनेमा स्टार आणि दोन वेळा खासदार राहिलेले मनोज तिवारी यांच्याविरोधात लढत देणार आहेत. जाणून घेऊया या लढतीविषयी… १. उत्तर पूर्व दिल्लीत ईशान्येकडील लोकसंख्या सर्वाधिक आहे. याशिवाय या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

UP तील नेत्यानंतर पंकजा मुंडेंचा व्हिडिओ, राज्यघटना बदलण्याच्या मुद्द्यावरुन मविआने भाजपला घेरलं!

मुंबई : उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला आहे. सरकार 272 खासदारांच्या बळावर सत्तेवर येते, परंतू देशाची राज्यघटना बदलण्यासाठी केवळ दोन तृतीयांश जागा हव्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर कडाडून टीका केली जात आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नरेंद्र मोदी कधी बोलणार? राहुल गांधींचा भंडाऱ्याच्या सभेत सवाल

भंडारा- देशात सुरु असलेल्या लोकसभेच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मावर बोलतात मात्र देशातील मुख्य समस्यांवर मात्र ते मौन बाळगून आहेत, अशी टीका राहुल गांधी यांना भंडाऱ्यात केलेली आहे. चांदूरवाफामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. काही निवडक उद्योगपतींसाठी नरेंद्र मोदी यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

स्मिता वाघ विरुद्ध करण पवार, कसा होणार जळगावमधला सामना?

जळगाव- भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील यावेळची लढत चुरशीची होणार असं मानण्यात येतयं. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू करण पवार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरेंकंडून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपाकडून स्मिता वाघ या रिंगणात आहेत. त्यामुळं ही लढत भाजपा विरुद्ध […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या मुंबई

अजित पवारांनी बहिणीला दिलेल्या शब्दाचं काय झालं, रोहित पवारांचा खोचक सवाल

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आहे. य़ासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून प्रचार जोरदार सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असल्यानं कौटुंबीक मद्देही प्रचारात येताना दजितायेत. शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवार यांना खोचक सवाल विचारलेला आहे. अजित पवार म्हणजेच भावानं शब्द दिला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘सन्मान दिला तरच महायुतीचा प्रचार करा’, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना काय आदेश, पंतप्रधान मोदींकडे काय केल्यात मागण्या

मुंबई- गुढपीढव्याच्या सभेत महाययुतीला जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षात आणि बाहेर उसळलेल्या वादळानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी मनसेचे नेते, सरचिटणीस, विभाग प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन राज यांनी निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केलीय. या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार का उभी करणार नाही, यावरही त्यांनी सभेत याबाबतची भूमिका स्पष्ट केल्याचं सांगितलंय. प्रचारात सहभागी […]