ताज्या बातम्या महाराष्ट्र

रत्नागिरी, पालघर आणि दक्षिण मुंबई मतदारसंघात भाजपचा उमेदवार? शिंदे गटाच्या दाव्याचं काय?

मुंबई गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिंकलेल्या मतदारसंघाच्या जागा महायुतीत शिंदे गटाकडे कायम राहिल असा दावा पक्षाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वेगळ चित्र दिसून येत आहे. दक्षिण मुंबईगेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले होते. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते दक्षिण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना खणखणीत उत्तर; सेल्फीवरुन मोदींच्या इतिहासाचा पाढाच वाचला!

मुंबई ‘आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात, अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात ऑपरेशन कमल? कमलनाथ-नकुलनाथ यांच्या जोडीसह ‘या’ आमदारांवर भाजपची नजर!

भोपाळ लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ आपला सुपूत्र नकुलनाथ यांच्यासह भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या कमलनाथ हे नकुलनाथ यांच्यासह दिल्लीला पोहोचले आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अलर्ट झाले आहेत. काँग्रेसच्या आमदारांना रोखण्यासाठी पक्ष संघटनेकडून प्रयत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक बिनविरोध; अधिकृत घोषणा अर्ज माघारीनंतरच

X : @milindmane70 मुंबई राज्यसभा निवडणुकीसाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र आज पडताळणीअंती त्यांचा अर्ज बाद ठरल्याने आता निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवायच्या सहा सदस्यांसाठीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजपाचे तीन व मित्र पक्षांचे दोन याप्रमाणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नागपूर ‘राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल’, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला. ‘ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही!’ असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. ते कोराडी (नागपूर) येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला स्वतंत्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यात महाविद्यालय वाटपात मंत्री चंद्रकांत दादांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप

@therajkaran छत्रपती संभाजीनगर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय वाटप करत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संस्थांना झुकते माप दिले आहे. यामुळे भाजप समर्थक तसेच इमाने इतबारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या अनेक संस्थांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  विशेष म्हणजे विधी महाविद्यालय वाटप करत असताना न्याय देऊ पाहणाऱ्या संस्थांवरच अन्याय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

5 मार्चपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार?

मुंबई निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनीदेखील १७ व्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही निवडणुकीच्या तारखा केव्हा जाहीर होतील, याची उत्सुकता आहे. साधारण ५ मार्च दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्च २०१९ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर ११ एप्रिल ते १९ मे यादरम्यान निवडणूक पार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक

मुंबई संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक देण्यात आलेली आहे. शेतकरी, कामगार व श्रमिकांच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये राज्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धू यांच्या आव्हानानुसार महाराष्ट्रातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘तत्वांवर बोलणं अशोक चव्हाणांना शोभत नाही’, संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई अशोक चव्हाण तत्वांविषयी बोलले तर लोक त्यांच्यावर हसतील, त्यामुळे त्यांनी विचारधारा, आदर्श, तत्व याविषयी बोलू नये; अशा शब्दात संजय राऊतांनी चव्हाणांवर बोचरी टीका केली. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. अशोक चव्हाणांवर बोलताना ते पुढे म्हणाले, चव्हाणांच्या कुटुंबाचं अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. काँग्रेसने त्यांना सगळं दिलं. तरी ते सोडून गेले. त्यामुळे तत्वांवर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मी मेलो तर या सरकारला सोडू नका’ मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन, आज उपोषणाचा पाचवा दिवस

जालना मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी जरांगे पाटलांना जबरदस्तीने सलाईन लावून उपचार सुरू केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना […]