महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमरिश पटेल यांच्या संस्थेवर नागपूर मनपा मेहेरबान; 600 कोटीची जमीन दिली 1 रुपये भाडे दराने

X: @therajkaran मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे होमपिच असलेल्या नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) याच पक्षाचे माजी विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेला सुमारे 600 कोटी रुपये बाजारमुल्य असलेली जमीन अवघ्या 1 रुपया प्रती चौरस फुट या दराने भाडे कराराने दिली आहे. या विरोधात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपची खेळी ; शरद पवारांचे विश्वासू अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर ?

मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला चितपट करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे माढ्यात आपला उमेदवार निवडून आणण्याच मोठं आव्हान भाजपासमोर निर्माण झालं. दरम्यान उत्तमराव जानकर पवार गटाकडे झुकले आहेत. त्यामुळे भाजपाने (bjp) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत नवा ट्विस्ट, नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय . या मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर माघार घेतली होती . भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच निर्माण झाला होता .आता भाजपकडून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना नाशिक लोकसभा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन अमित शाह आणि शरद पवारांत जुंपली, शाह म्हणाले माफी मागा, पवारांचं काय उत्तर?

मुंबई- लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगत चाललेला दिसतोय. पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानानंतर सत्ताधारी भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसही मुस्लीमधार्जिणी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय. राम मंदिराला (Ram temple) काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीनं विरोध केल्याचं ते आता सभांमध्ये सांगतायेत. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

पाच वर्षांत कोणतंही पद नसताना पंकजा मुंडेंच्या संपत्तीत 10 कोटींनी वाढ, किती आहे पंकजा मुंडेंची संपत्ती?

बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधून भाजपाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, गेली पाच वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. पाच वर्षांच्या काळात विधान परिषद, राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांचा हा वनवास संपलेला दिसतोय. मात्र या पाच वर्षांच्या काळातही त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘ज्यांना घरातील मंगळसुत्राचा सन्मान ठेवता आला नाही..’, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची काय टीका?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या एका वक्तव्यानं सध्या राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतायेत. काँग्रेस (Congress) सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीची मोजणी करुन ती संपत्ती घुसखोर आणि मुसलमानांमध्ये (Muslim) वाटून टाकतील, असं नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून सांगतायेत. इतकंच नाही तर महिलांची मंगळसूत्रंही काँग्रेसवाले नेतील, असा आरोप […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन, काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?

बीड- बीडच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणींची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना पदर पसरते, ही एक संधी आपल्याला द्या, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना केलं. यावेळी त्या भावूक झाल्याचंही पाहायला मिळालंय. याचवेळी त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतोय ; शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा, बैठकांना जोरदार वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप(Bharatiya Janata Party ) , मोदी सरकार आणि फडणवीसांवर कडाडून टीका केली आहे .याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवार साहेबांनी किती कोलांट्या उड्या मारल्या याचे व्हिडीओ दाखवले, तर अवघड होईल, […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

जाहीर प्रचार संपल्यानंतर परभणीत रात्री ड्रामा, महायुतीचे उमेदवार जानकर यांची गाडी तपासण्यावरुन वाद

परभणी – दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी संध्याकाळी संपला. आता शुक्रवारी राज्यातील ८ जागी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार थंडावला असला तरी पुढचे काही तास हे संपर्कासाठी आणि छुप्या प्रचारासाठी महत्त्वाचे मानले जातात. याच काळात परभणीत रात्री महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या गाडीची तपासणी काही तरुणांनी केल्यानं खळबळ उडालीय. महादेव जानकर त्यावेळी गाडीत नव्हते. मात्र गाडीचे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

उद्या मतदानाचा दुसरा टप्पा; 12 राज्यं आणि 88 मतदारसंघात मतदान

नवी दिल्ली : उद्या 26 एप्रिल रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात आठ मतदारसंघातील मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेश मिळून ८८ लोकसभा मतदारसंघांवर मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात […]