ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, एकनाथ शिंदेंच्या सुपूत्राचं नाव नाही; चर्चेला उधाण

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ८ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. मात्र पहिल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरातून संजय मंडलीक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे आणि हातकणंगलेमधून धैर्यशिल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार ; बच्चू कडूंचा मात्र उमेदवारीला विरोध

मुंबई : आगामी लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीत (amravati )राजकीय घडामोडीना वेग आला आहे .भाजपकडून अमरावतीच्या (Navneet Rana )नवनीत राणा याना लोकसभेची उमदेवारी देण्यात आली आहे . भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्यांनी काल रात्री भाजपमध्ये (BJP )प्रवेश केला आहे . यावेळी उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद, अमरावतीत विजय भाजपचाच होणार आहे, असं राणा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेच्या जागेवरुन सदाभाऊ खोत ठाम, आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार

मुंबई : महायुती असो की महाविकास आघाडी, लोकसभा निवडणुकीतील मतदारसंघाचा तिढा सोडवणं सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नेत्यांकडून थेट पक्षालाच आव्हान दिलं जात आहे. हातगणंगले मतदारसंघातही महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून सदाभाऊ खोतदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोतांकडून करण्यात येत आहे. […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्यातून उदयनराजे, नाशिकमधून भुजबळ?, महायुतीत कोणत्या मतदारसंघांत बदल?

मुंबई- सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत सुरु असलेला तिढा सुटल्याचं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासी झालेल्या चर्चेनंतर या विषयावर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येतंय. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवतारेंचा पवार विरोध मावळला? शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी वर्षावर काढली शिवतारेंची समजूत, आता भूमिका स्पष्ट करणार

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या शिंदे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा राग मावळला असण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवतारे यांच्याशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. या बैठकीत शिवतारे यांच्या आक्षेपावर चर्चा करुन त्यांची समजूत काढली असल्याचं सांगण्यात […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नवनीत राणा भाजपात, बच्चू कडू नाराज, प्रहार जनशक्ती लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता

मुंबई- अमरावती लोकसभा मतादरसंघातून अखेर भाजपाच्या उमेदवाराच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. युवा स्वाभिमानच्या खासदार नवनीत राणा यांना भाजापनं उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर रात्री उशिरा नवनीत राणा यांनी नागपुरात भाजपात प्रवेश केला. रवी राणा यांनी नेहमीच अपक्ष असतानाही भाजपाची साथ केली होती. आता पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर भाजपात प्रवेश करत असल्याचं राणा यांनी स्पष्ट केलंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत जाणार का? जरांगे पाटलांची प्रकाश आंबेडकरांनी का घेतली मध्यरात्री भेट? आजचा दिवस निर्णायक

मुंबई- मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटत असल्याचं दिसत असतानाच वंचित मविआसोबत जाणार की नाही, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मविआतील तिढा सुटला आणि त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. २६ मार्च म्हणजेच मंगळवारी मविआनं प्रकाश आंबेडकरांना चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सात जागांवर वंचित अडून बसल्याचं सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Lok Sabha : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! एका क्लिकवर वाचा राजकीय समीकरण!

मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून घटकपक्षांसह जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांसह संभाव्य उमेदवारांचेही जीवही टांगणीला लागले आहे. दरम्यान महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा आकडा सूत्रांकडून सांगण्यात आला आहे. यानुसार, महायुतीचे जागावाटपासह उमेदवारांची नावंही ठरली असल्याचं सांगितलं जात आहे. २८ मार्च, गुरुवारी म्हणजे उद्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोकणातला राजकीय शिमगा सुरुच, महायुतीची उमेदवारी कुणाला? अद्यापही गुलदस्त्यात; राणे-जठार की सामंत सगळेच वेटिंगवर

मुंबई- कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवात आणि उत्साहात, कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची चर्चा सगळशीकडं रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात भाजपाच्या २३ उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यारपही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार कोण, हा सस्पेन्स मात्र कायम दिसतोय. शिमगोत्सवाच्या निमित्तानं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी आढळराव पाटील हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रणांगणात, आज राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर पडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आढळराव पाटील शड्डू ठोकणार आहेत. आज २६ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल […]