ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःची भीती टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानां सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी एका मुलाखतीत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपमधील मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता असा आरोप केला आहे . याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी चोख प्रत्युत्तर दिल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नेमक्या कुणाच्या अटकेचा होता प्लॅन, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? अटकेच्या भीतीनं फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडलं, काय म्हणालेत संजय राऊत?

मुंबई- मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचं षडयंत्र रचलं जात होतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानं नवं राजकारण रंगलेलं आहे. खोट्या गुन्हात या चारही नेत्यांना अडकवण्याचा कट होता, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.२०२४ च्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा, काय निघालाय तोडगा?

मुंबई- महायुतीत अद्यापही जागावाटटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. अद्यापही दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आणि नाशिक या सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अशात राज्यात १६ जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आत्तापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर झाले आहेत. या सातपैकी सहा जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाच्या विरोधाचे मुद्दे अजित पवार राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात, काय आहेत संकेत?

मुंबई- काँग्रेस आणि भाजपाच्या जाहीरनाम्यांनंतर प्रादेशिक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी, असं या जाहीरनाम्यातून जाहीर करण्यात आलेलं आहे. राज्यातील इतर प्रादेशिक पक्षांनी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना जाहीरनामा प्रसिद्ध करत अजित पवारांनी आघाडी घेतल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘रश्मी ठाकरे कपटी, उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष कोंडून ठेवलं’, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा काय दावा?

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यापाठीमागे रश्मी ठाकरेंची महत्त्वाकांक्षा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. अशात लोकोसभा निवडणुकांच्या धामधुमीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट रश्मी ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. काय म्हणालेत सदा सरवणकर? रश्मी ठाकरे या दिसायला भोळ्या दिसत असल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री सोडा, मंत्री पण केलं नसतं, काय लायकी आहे?, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

मुंबई- उद्धव ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या गौप्यस्फोटाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री काय, मंत्रीसुद्धा केलं नसतं, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. आदित्य ठाकरे यांनी कोणती निवडणूक लढवली, त्यांच्याकडे काय अनुभव आहे, त्यांची लायकी काय आहे, या शब्दांत बावनकुळेंनी संताप व्यक्त केलेला आहे. राज्यातील नालायक माणसांची स्पर्धा गेतली तर उद्धव ठाकरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपली, ठाकरेंचा नवा गौप्यस्फोट, फडणवीसांचं काय उत्तर?

मुंबई- अमित शाहा यांच्यासोबत मातोश्रीवर बंद खोलीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण झालं नाही म्हणून युती सोडून महाविकास आघाडीत गेल्याचं उद्अधव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं. याला अशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती. उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, असं प्रत्युत्तरही भाजपाकडून अमित शाहा ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आता लोकसभा निवडणुकांच्यापूर्वी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार, खैरे-भुमरे की जलील यांना संधी?

संभाजीनगर- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीत ज्या जागेचा वाद होता. त्या वादावर अखेरीस पडदा पडलाय. छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे लढतील असं स्पष्ट झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये रोहयोमंत्री असलेल्या आणि संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी असलेल्या भुमरेंना मुख्यमंत्र्यांनी मोठी संधी दिल्याचं मानण्यात येतंय. भुमरे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही असणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या जागेवर कोणाची वर्णी ? हेमंत गोडसे कि अजय बोरस्ते

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरु आहे . नुकतीच या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतली आहे . यानंतर हा तिढा सुटेल असे बोलले जात आहे. मात्र आता शिवसेना शिंदे गटातदेखील दोन गट पडले आहेत. या जागेसाठी एकीकडे खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमदेवार ठरला ; चंद्रकांत खैरें विरोधात संदिपान भुमरेंना तिकीट

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यातील जागा वाटपाचा वाद मिटलेला नव्हता . महायुतीतील (Mahayuti) नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती मात्र यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जागेचा मुद्दा रखडलेला होता .दरम्यान, या जागेसाठी आता महायुतीचा उमेदवार ठरला असून […]