मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानां सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी एका मुलाखतीत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपमधील मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता असा आरोप केला आहे . याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी चोख प्रत्युत्तर दिल आहे . फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत:ची अटक टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला आणि पक्ष फोडायला लावले असा खळबळजनक आरोप करत राऊतांनी फडणवीस, तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे .
महाविकास आघाडीने जून 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं. भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच आघाडीच प्लानिंग होतं . त्यांनी अत्यंत बेकायदेशीरपणे, चोरून विरोधकांचे फोन ऐकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकूमावरून विरोधकांवर पाळत ठेवण्यात आली होती . त्या प्रकरणाची चौकशी सुरू होती, गुन्हे दाखल झाले होते तसेच याप्रकरणी आपल्याला अटक होऊन शिक्षा होईल, या भीतीतून फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणला असा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे
तसेच भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटे बोलणाऱ्यांना स्थान आहे किंवा एखादा मुल भारतीय जनता पक्षात गेला कि त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही कसे खोटं बोललं पाहिजे किंवा तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे. त्यानुसार एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायेत पण आज तुमची जेलवारी टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असेही राऊत म्हणाले आहेत .या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होणार आहे . या केंद्रातलं सरकार 100% बदलतंय. तुम्ही सत्तेत आल्यावर गुन्हे रद्द केले, चौकश्या रद्द केल्या. आम्ही सत्तेवर आल्यावर पुन्हा एकदा त्या चौकशा पुन्हा सुरू करू, असा इशाराही संजय राऊत यांनी फडवणीस आणि शिंदे यांना दिला आहे .