राम कुणाला पावणार? अनेक उमेदवार राममंदिरांमध्ये, जन्मोत्सवात सहभागी, रामाचं राजकीय महत्त्व वाढलं?
मुंबई – अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्यानंतर, आता राम मंदिराचं निर्माण हा प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. यातच ऐन लोकसभा प्रचाराच्या धामधुमीत आलेल्या रामनवमीमुळं राजकीय नेत्यांचे पाय राम मंदिरांकडे वळाल्याचं पाहायला मिळालंय. यात महायुती आणि महाविकास आघाडीची नेतेमंडळीही आघाडीवर असल्याचं दिसलं. काळाराम मंदिरात राजकारण्यांची गर्दी नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवाला उपस्थित […]