ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… तर राहुल गांधींनी पक्षातून बाजूला व्हावं “; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला

मुंबई : देशासह राज्यात लोकसभेसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असताना आता रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राजकारणातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे . गेल्या दहा वर्षात राहुल गांधी यांनी स्वतःही काही केलं नाही आणि पक्षात दुसऱ्या कुणालाही काही करायला दिलं नाही, २०१४च्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

आशिष शेलार थेट सलमान खानच्या भेटीला, काय शिजतंय राजकारण?

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमान खान याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी सलमानचे वडील सलीम खान, हेलन यांची भेट झाल्याचं आशिष शेलार यांनी एक्स पोस्टवरुन कळवलेलं आहे. या लंच डिप्लोमसीत परिसरातील सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवांबाबत चर्चा झाल्याचंही शेलारांनी सांगितलंय. सलमान खानची भेट का महत्त्वाची बाबा सिद्दीकी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘अकोल्यातील काँग्रेसचा उमेदवार हा संघ विचारांचा, नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’, प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघात वंचितचा काय प्रचार?

मुंबई- वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर ज्या अकोला मतदारसंघातून रिंगणात आहेत, त्या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला आता लक्ष्य करण्यात येतंय. अकोल्यात संघ संस्कारात वाढलेल्या अभय पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्याचं सांगत वंचितनं त्यावर आक्षेप घेतलाय. नाना पटोले हे भाजपाचे स्लीपर सेल असल्याचा आरोपही वंचितच्या वतीनं करण्यात येतोय. दुसरीकडं महायुतीपासून फारकत घेतलेल्या बच्चू कडू यांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘कोकणात काँग्रेस पक्ष संपवण्याचा मित्र पक्षांचा प्रयत्न’, सांगली, भिवंडीपाठोपाठ पालघरमध्येही काँग्रेस नेत्यांची नाराजी

पालघर – महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना आता काँग्रेस नेते अधिक आक्रमक होताना दिसतायेत. सांगलीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रे,सेनं विरोध केलाय. तर भिवंडीत शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळअया मामा म्हात्रेंच्या विरोधात काँग्रेसनं उघड उघड बंड पुकारलेलं आहे. यातच आता पालघर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही या जागी ठाकरेंच्या शिवसेनेनं भारती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात, चंद्रपूरातून फोडणार प्रचाराचा नारळ

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरपासून प्रचाराच्या सभेला सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातून सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चंद्रकांत रघुवंशींची घरवापसी? येत्या 2 दिवसात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील जागा मविआकडून काँग्रेसला सोडण्यात आली आहे. मात्र अद्याप काँग्रेसला येथून चांगला उमेदवार मिळू शकलेला नाही. प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने एका नेत्याची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यांची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रघुवंशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आघाडीत पायपुसणे व्हावे’, नाना पटोले यांच्यावर आशिष शेलार यांची कवितेतून टोलेबाजी

मुंबई– भिवंडी आणि सांगली मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि मविआतील इतर दोन घटक पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. सांगलीची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर केलीय. या मतादरसंघावर काँग्रेसचा दावा असतानाही, ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे भिवंडीची जागा शरद पवारांनी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना जाहीर केलीय. यामुळं काँग्रेसमधील वरिष्ठ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेची शिवसेना आता कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलवर चालतेय ; सचिन सावंतांची टीका

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha)मतदारसंघातील उमदेवार जाहीर करण्यात आला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची घोषणा केली . आता या उमेदवारीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत( Sachin Sawant) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे . त्यांनी म्हटले की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वातावरण तापलं ! सांगली काँग्रेसचीच हे एखादं जनावर सुद्धा सांगेल ; विश्वजित कदमांची राऊतांवर टीका

मुंबई ; सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच पेटलं आहे . अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगली दौऱ्यावर आहेत . त्यांनी लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारातही सहभाग घेतला आहे . दुसरीकडे या मतदारसंघातून लढण्यास काँग्रेसही ठाम आहे . यावरून आता काँग्रेसचे विश्वजित कदम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांचं पायलट दुसर कोणीतरी .. ते जिकडे नेतील तिकडे ते जातायत ; राऊतांचा टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे . गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजूनही संपलेला नाही . यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sangli Loksabha) तीन दिवस सांगली दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यावेळी […]