नवी दिल्ली- लोकसभा निवडमुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यात 21 राज्यांतील 102 जागांसाठी एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. यातील एकूण 26 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले असल्याची धक्कादायक माहिती आहे. यातील 16 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर 10 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय.
एकूण उमेदवार- 1618
गुन्हे दाखल असलेले उमेदवार-252
गंभीर गुन्हे दाखल – 161
द्वेषपूर्ण विधानांप्रकरणी गुन्हा- 35
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा- 19
महिलांशी संबंधित गुन्हे-18
दोषी घोषित- 15
खुनाच्या प्रकरणातील – 07
किती उमेदवार कोट्यधीश
पहिल्या टप्प्यातील एकूण 28 टक्के उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती आहे. त्यांची संख्या 450 च्या आसपास आहे. यात महाराष्ट्रातील 36 उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांची सरासरी संपत्ती ही 4.51 कोटी इतकी आहे.
टॉप 3 श्रीमंत उमेदवार
- नकुल नाथ – मध्यप्रदेश काँग्रेस-716 कोटी
2.अशोक कुमार- तामिळनाडू, एायडीएमके, 662 कोटी - 3. देवनाथन यादव- तामिळनाडू, भाजपा- 304 कोटी
हेही वाचाःनाशिकचा फटका साताऱ्याला, महायुतीत तीन जागांचा तिढा अद्यापही कायम, कधी सुटणार पेच?