मुंबई – उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवाराचा शोध सुरु आहे. त्यातच काल अमोल कीर्तिकर यांची आठ तास ईडी चौकशी पार पडली. अमोल कीर्तिकर हे ईडी कार्यालयात असताना, त्यांचे वजील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे मात्र महायुतीच्या एका मेळाव्यात असल्याचं पाहायला मिळालं. या मेळाव्यात अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय.
उभे राहणार नाही तर प्रचार करणार
या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या गजानन कीर्तिकरांनी अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात प्रचार करु असं वक्तव्य केलं. त्यानंतर माध्यमांमध्ये गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशा बातम्या येऊ लागल्या. त्यानर लागलीच स्पष्टीकरण देत गजानन कीर्तिकर यांनी लढणार नाही तर त्यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय.
चुरशीची लढत
उत्तर पश्चिम मुंबईची लढत लक्षवेधी ठरणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांचे वडील आणि शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी तलवार म्यान केल्याचे चित्र होतं. मात्र, एकाएकी त्यांनी सोमवारी महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे महायुतीने अद्याप इथे आपला उमेदवार घोषित केलेला नाही. कीर्तीकर आपल्या मुलाविरोधात प्रचारातही उतरणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र त्यावर गजानन कीर्तिकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.
महायुतीचा विजय निश्चित- शेलार
अमोल कीर्तिकर यांना हरविण्यासाठी खासदार गजानन कीर्तिकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचाःमुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे कारण?