ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शिवसैनिको नाराज होऊ नका .. मी कुणासाठीही आग्रही नाही ” ; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढणार या चर्चेला जोर आला होता . यावर आता त्यांनी निवडणूक लढवणार का याबाबतचा खुलासा केला आहे . ते म्हणाले , “शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मी पण शिवसैनिक म्हणून आलोय. नाराज होण्याचे कारण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“….. तर त्यांची उमेदवारी काढून घ्यावी ” ; अभिजीत गंगोपाध्यायांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड

मुंबई : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay)यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांच्यावरुन टीका टिप्पणी केली आहे . यावरूनच आता त्यांच्यावर काँग्रेसने(Congress) टीकेची झोड उठवली आहे .काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश( Jairam Ramesh)यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत 190 उमेदवारांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातील किती नावं समोर?

नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी २५ मार्च रोजी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये राजस्थानमधून चार आणि तमिळनाडूतून एका उमेदवाराचा समावेश आहे. कोटामधून प्रल्हाद गुंजल, अजमेरहून रामचंद्र चौधरी, राजसमंदहून सुदर्सन सिंह रावत, भीलवाडाहून दामोदर गुर्जर यांना तिकीट देण्यात आलं आहे. गुंजल या राजस्थानातील भाजप नेत्री आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय आहेत. ते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागावाटपावरून महायुतीत शिमगा तर आघाडीत धुळवड

X: @ajaaysar मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार शिमगा सुरू आहे, तर काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित या मविआच्या घटकपक्षांमध्ये देखील वादविवादांची धुळवड खेळली जात आहे. भाजपचे राज्यातील काही उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २८ मार्चला तर शिवसेना उद्या (दि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वरुण गांधींना तिकीट नाकारणं भाजपला जड जाणार

मुंबई : शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे उत्तर प्रदेशातील पिलिभीतचे (Pilibhit lok Sabha)खासदार वरुण गांधी (Varun gandhi) यांना भाजपन (BJP) जोरदार धक्का दिला आहे. वरुण गांधी यांंना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जितिन प्रसाद (Jitin Prasad )यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळं वरुण गांधी आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लेकीसाठीचे प्रयत्न ठरले फोल, चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी, काय असेल वडेट्टीवारांची भूमिका?

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर या मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा होती. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार या जागेसाठी आग्रही होती. त्यांनी थेट दिल्लीवारीही केली होती. तर दुसरीकडे दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोकरक यांनी या जागेवर आधीच दावा केला होता. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याबाबत निश्चितता नव्हती. […]

महाराष्ट्र

चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास

मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar)आणि प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभेचा गड कायम राखेन, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर लोकसभा(Chandrapur loksabha ) मतदार संघामध्ये भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील पाच जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपचा धुरळा उडणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पाच जागावर निवडणुकीत काँग्रेस […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत आहे की नाही?, सस्पेन्स कायम? कोल्हापुरात शाहू छत्रपतींना वंचितचा पाठिंबा

मुंबई- महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच, वंचित मविआत आहे की नाही, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. २६ मार्चपर्यंत मविआच्या प्रस्तावाची वाट पाहणार असून त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून दिलेल्या उमेदवारीला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी वंचित ताकदीनिशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकीटं पाठवली थेट सोनिया आणि राहुल गांधींना? कुणी केलाय हा प्रताप?

मुंबई – लोकसभेच्या तोंडावर रणदीप हुडा आणि अंकिता लोखडे यांची प्रमूख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. हिंदी आणि मराठीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना पहिल्या दिवशी महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ,स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माफीवीर अशी टीका करणाऱ्या काँग्रेसला डिवचण्याची संधी या निमित्तानं भाजपानं घेतलेली आहे. उजव्या विचारसरणीच्या अनेकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन […]