ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपमध्ये जाण्यापूर्वी ते सोनिया गांधींसमोर रडले; राहुल गांधींच्या विधानावर ‘त्या’ वरिष्ठ नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल रविवारी १७ मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. सर्वांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आणि शक्तिप्रदर्शन केलं. या सभेत राहुल गांधींनी भाजपवर खरमरीत टीका केली. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडण्यापूर्वी माझ्या आईला भेटला आणि रडला. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा तिढा सुटला : सर्वाधिक जागेवर ठाकरे गटच लढणार!

X: @therajkaran आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच सर्वाधिक जागावर निवडणूक लढवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

‘राहुल गांधी यांची शिवाजी पार्कातील सभा म्हणजे हास्यजत्रा’, भाजपाच्या मोठ्या नेत्याची टीका, उद्धव ठाकरेंनाही चॅलेंज

नागपूर– राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कात पार पडलेली सभा म्हणजे हास्यजत्रा होती, अशी टीका भाजपानं केलीय. राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही, अनेक जणं सभा सोडून निघून गेले, ५० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीकाही करण्यात येतेय. राहुल यांचं भाषण म्हणजे हास्यजत्रा होती अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘अल्पसंख्याक’ची व्याख्या देशाचं विभाजन करणारी, घटनेतील व्याख्येचा पुनर्विचार व्हावा, काय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी?

नागपूर – देश जर सगळ्यांचा असेल तर या देशात कुणी अल्पसंख्याक कसे, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी उपस्थित केलेला आहे. अल्पसंख्याक याची सध्याची व्याख्या ही देशाचं विभाजन करणारी आहे, त्यामुळे घटनेतील या व्याख्येचा पुनर्विचार होण्याची गरज असल्याचं मतही होसबाळे यांनी व्यक्त केलेलं आहे. देशआतील अल्पसंख्याक लांगूलचालनाला संघानं स्थापनेपासून विरोध केलेला आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचं जागावाटप ठरलं? वंचितसह आणि वंचितशिवाय असे दोन पर्याय? काय आहे गणित?

मुंबई- राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट मुंबईत पाहायला मिळाली. काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते शिवाजी पार्कवरच्या सभेत उपस्थित होते. मात्र या सगळ्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीकडं सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चांत वंचित नाराज आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राजाचा आत्मा EVM, CBI, ED मध्ये’; शिवाजी पार्कात इंडिया आघाडीचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी १७ मार्च रोजी रात्री मुंबईत पार पडला. या सभेत राहुल गांधीसह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राजाची आत्मा EVM, CBI, ED आणि इन्कम टॅक्समध्ये आहे. याच्या मदतीने ते नेत्यांना घाबरवून भाजपमध्ये सामील करवून घेत आहेत. काँग्रेस, शिवसेना, NCP-SCP मधील नेते भाजपमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत होणार लोकसभा निवडणुका, 4 जूनला मतमोजणी, तुमच्या मतदारसंघात कधी मतदान?

नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीय. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यात निवडणुका होणार असून, मतमोजणी 4 जूनला होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात महाराष्ट्रात कधी होणार मतदान 4 विधानसभा राज्यांच्या निवडणुकाही होणार या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सगेसोयरे अध्यादेशाला वेळ लागणार, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी केलं स्पष्ट, अधिसूचनेवर साडे आठ लाख हरकती, जरांगे काय करणार?

मुंबई – राज्यात आजपासून लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमामपत्र देताना सगेसोयरेंनाही प्रमाणपत्र मिळावीत, यासाठीचा सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. अध्यादेश निघाला नाही तर लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..

मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]