ताज्या बातम्या लेख

विकलांग काँग्रेसला भविष्य तरी काय?

X: @therajkaran भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करून मोदी सरकारने खूप मोठी उपलब्धता मिळविली आहे. यापूर्वी राम मंदिर तसेच कलम ३७० हटवून भाजपने एक वेगळाच चमत्कार करून दाखविला. यामुळे देशात भाजप अधिक शक्तिशाली होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केलेले हे काम तरुणांना तसेच भाजप धार्जिण्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरत आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?

मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर, आज केंद्रीय निवडणूक आयोगाची 3 वाजता पत्रकार परिषद

नवी दिल्ली : आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून यात ते लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. यंदाची निवडणूक ६ ते ७ टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वसंत मोरेंची पुणे लोकसभेच्या तिकिटासाठी सर्वपक्षीय वणवण

X: @therajkaran गाजावाजा करत अगदी राज ठाकरे यांच्या फोटोला दंडवत घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची राजकीय हुशारी दाखवत , मीडियाला अलर्ट मोडवर ठेवून वसंत मोरे यांनी त्यांचा अपेक्षित राजीनामा दिला. पुणे लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही पक्षातून निवडणूक लढवायचीच आहे हा एकमेव उद्देश कोणापासूनही न लपवता त्यांनी मनसेला रामराम ठोकला. राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच क्षणी विरोधी पक्षांकडून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआची जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात, वंचितला सांगितला आकडा; आता बॉल आंबेडकरांच्या कोर्टात

मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटपाची चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ठाकरे गट २४ आणि वंचित २४ या फॉर्म्युल्यापासून सुरुवात करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मविआकडून जागावाटपाचा आकडा सांगण्यात आला आहे. आता आंबेडकरांना यावर निर्णय घ्यायचा असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. प्रकाश आंबेडकरांना मविआकडून लोकसभेसाठीचा आकडा सांगण्यात आला आहे. आंबेडकर यावर पक्षातंर्गत चर्चा करतील आणि यानंतर उत्तर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

MNS News : मनसेला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर 

X: @therajkaran वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा (MNS) राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार या चर्चाना काही दिवसापासून उधाण आले होते .मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन, असं ते राजीनामा देताना म्हणाले होते. त्यातच आता वसंत मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar )यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

भारत न्याय यात्रेमुळं काँग्रेस-मविआचं आत्मबल उंचावतंय? राहुल गांधींचा काय आहे लोकसभेचा अजेंडा? महाराष्ट्रात यात्रेचा काय परिणाम?

नाशिक- भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढत, काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत. नंदुरबारमधून राज्यात दाखल झालेली राहुल गांधींची भारत न्याय यात्रा धुळे, मालेगावचा टप्पा ओलांडत तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या दौऱ्यात राहुल गांधी आज त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. या यात्रेदम्यान आदिवासी, महिला, शेतकरी, तरुण यांचे प्रश्न […]

ताज्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडची मूळ कल्पना नेमकी कुणाची? फडणवीसांनी ठाकरेंची कल्पना असल्याचं नाकारलं, आता आणखी एका नावाची चर्चा

मुंबई – मुंबईत कोस्टल रोड (Coastal road) सुरु झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आता राजकीय पक्षांत चढाओढ सुरु झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ही कल्पना होती आणि ती आता पूर्णत्वास आली असा दावा, ठाकरे शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) करण्यात येतोय. तर दुसरीकडं ही जुनी कल्पना होती. उद्धव ठाकरेंच्या आधीपासून हा रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कैसे है आप दाजीसाहब!’ गळाभेट करीत राहुल गांधीनी केली विचारपूस! सोनिया गांधींशी साधला मोबाईलवरून संपर्क!

भारत जोडो यात्रेनिमित्ताने खासदार राहुल गांधी हे धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन घेतली.

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Pune Lok Sabha: पुण्यात आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही

वसंत मोरेंच्या मनधरणीमुळे मविआचे पितळ उघड X: @therajkaran मुंबई: पुण्यातील बहुचर्चित नेते वसंत मोरे यांनी गेले अनेक महिने अपेक्षित असलेला राजीनामा देऊन मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाच. मोरेच्या राजीनाम्याची डोळ्यात तेल घालून वाटच बघत असलेल्या काँग्रेस , शिउबाठा आणि शरद पवार गट या तिघांनीही त्यांना आमच्याच पक्षातून पुणे लोकसभा लढावी, असे आमंत्रण दिले आहे. मविआकडे […]