ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर, 17 मार्चपासून लोकसभा प्रचाराचा प्रारंभ

X: @therajkaran मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी देशभरातील इंडिया आघाडीच्या सुमारे ३० नेत्यांना सभेचं निमंत्रण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. १० […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? शेट्टी, जानकरांनाही सोबत घेणार? वंचितला किती जागा?

मुंबई – मविआची बुधवारी झालेली जागावाटपाची बैठक कोणत्याही ठोस तोडग्याविना पार पडल्याचं आता सांगण्यात येतंय. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. या बैठकीत मविआच्या तिढा असलेल्या १५ आणि वंचितनं प्रस्ताव दिलेल्या ५ जागांवर अशी २० जागांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या चर्चेतून तोडगा निघालेला नसल्याचं दिसतंय. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार, स्मृती इराणींना पुन्हा देणार चॅलेंज?

X: @therajkaran नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधींनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात २००४ मध्ये अमेठीतूनच केली होती. यावेळी त्यांना प्रचंड मतांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर मोदींच्या लाटेमुळे ही जागा भाजपच्या स्मृती इराणी जिंकल्या होत्या. अलीकडेच राहुल गांधी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘जनतेनंच ठरवलंय’ : सतेज पाटील यांची निवडणुकीसाठी नवीन टॅगलाईन

X: @therajkaran मुंबई: महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) पूर्ण तयारीने उतरले असून त्यांनी ‘ जनतेनेच ठरवलंय’ ही नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे. या टॅगलाईनखाली काँग्रेस (Congress) निवडणूक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सांगलीच्या जागेवरुन मविआत तिढा, विशाल पाटील की चंद्रहार पाटील?, चौरंगी लढत होण्याची शक्यता

मुंबई- सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हमून ओळखला जातो. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाल्यानं सांगली मतदारसंघ हा ठाकरे शिवसेनेकडे जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. याला स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केलाय. त्यामुळं महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता ही जागा काँग्रेस लढवणार की ठाकरे शिवसेना हे पहावं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील सहापैकी पाच जागा भाजपा लढणार?, कोणती एक जागा शिंदे शिवसेनेला?

मुंबई – मुंबई परिसरातील सहा लोकसभा जागांपैकी पाच जागा लढवण्याच्या हालचाली भाजपातून सुरु झाल्याचं दिसतंय. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा भआजाचा प्रयत्न आहे. यासाठी मुंबईतील सहापैकी पाच खासदार भाजपाचे असावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच जागा सोडण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय. कोणत्या मतदारसंघांमधून भाजपा इच्छुक? सध्या मुंबईत भाजपाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अमित शाहांसोबतच्या रात्रीच्या खलबतीमध्ये नेमकं काय ठरलं? मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शाहांचा काय संदेश?

मुंबई– लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सभा पार पडल्यानंतर अमित शाहा मुंबईत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु होती. जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? महायुतीत लोकसभेच्या ४८ जागांवरुन तिढा निर्माण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार? अमित शाहांच्या संकेतानंतर काय आहे राजकीय प्रतिक्रिया?

मुंबई– केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्म घडामोडी घडताना दिसतायेत. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावात अमित शाहा यांच्या मंगळवारी जाहीर सभा झाल्या. या दोन्ही सभांतून अमित शाहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेल्या विकासाचा पाढाच त्यांनी सभांमध्ये सांगितलाय. छत्रपती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे ठरले : जळगाव, कोल्हापूरचा तिढा अखेर सुटला!

X: @therajkaran मुबंई: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणारआहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 : 15 तारखेला देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होणार

मुंबई : येत्या 15 मार्चला देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून येत्या 15 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. याच दिवसापासून देशात आचारसंहिताही लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात आणि महाराष्ट्रातील निवडणूक 4 टप्प्यात पूर्ण झाली होती. यानंतर २३ मे […]