ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार, स्मृती इराणींना पुन्हा देणार चॅलेंज?

X: @therajkaran

नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधींनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात २००४ मध्ये अमेठीतूनच केली होती. यावेळी त्यांना प्रचंड मतांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर मोदींच्या लाटेमुळे ही जागा भाजपच्या स्मृती इराणी जिंकल्या होत्या.

अलीकडेच राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा भाग म्हणून अमेठीला गेले होते. या वेळी राहुल या जागेवरून निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात होते. राहुल यांचे दिवंगत काका संजय गांधी, दिवंगत वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी हे अमेठीमधून खासदार राहिले आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार स्मृती इराणी यांच्या विरोधात राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून रिंगणात उतरले, तर अमेठीत आणखी एक रंजक लढत पाहायला मिळू शकते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल यांचा 55,120 मतांनी पराभव केला. मात्र, राहुल गांधींनी निवडणुकीत वायनाड मतदारसंघातून विजय मिळवून लोकसभेत प्रवेश केला होता.

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी कधी?
पुढील दोन ते तीन दिवसात काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज गुरुवारी ७ मार्च रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी १३०-१५० उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. वायनाड मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित असल्यामुळे राहुल गांधी वायनाडमधून दुसऱ्यांदा रिंगणात उतरणार आहेत.

राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवतील, अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने बुधवारी दिली आहे. दिल्लीतील बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल म्हणाले की, राहुल गांधी हे अमेठीतून पक्षाचे उमेदवार असतील आणि लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे