ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपली, ठाकरेंचा नवा गौप्यस्फोट, फडणवीसांचं काय उत्तर?

मुंबई- अमित शाहा यांच्यासोबत मातोश्रीवर बंद खोलीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण झालं नाही म्हणून युती सोडून महाविकास आघाडीत गेल्याचं उद्अधव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं. याला अशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती. उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, असं प्रत्युत्तरही भाजपाकडून अमित शाहा ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आता लोकसभा निवडणुकांच्यापूर्वी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार, खैरे-भुमरे की जलील यांना संधी?

संभाजीनगर- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीत ज्या जागेचा वाद होता. त्या वादावर अखेरीस पडदा पडलाय. छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे लढतील असं स्पष्ट झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये रोहयोमंत्री असलेल्या आणि संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी असलेल्या भुमरेंना मुख्यमंत्र्यांनी मोठी संधी दिल्याचं मानण्यात येतंय. भुमरे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही असणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीचा तिढा सुटला ; नाशिकच्या लोकसभेतून छगन भुजबळांची माघार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून तिढा निर्माण झाला होता . या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दावा ठोकला होता . मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वतःहून आपण […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘संकटमोचक गिरीश महाजन हे देव नाहीत’, ठाकरेंच्या शिवसेनेचे उन्मेष पाटील कडाडले

जळगाव- जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या स्मिता वाघ यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून करण पवार यांनी आव्हान दिलं आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत, करण पवार यांना उमेदवारी दिलीय. आता उन्मेष पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा वाद मतदारसंघात प्रचारादरम्यान दिसतोय. गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांचे नीकटवर्तीय असलेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार ठरला, भाजपाच्या मंगलप्रभात लोढांना तिकीट?

मुंबई – पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहेत. त्यात दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात प्रचंड चुरस आहे. अशात दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार ठरला असल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबईची जागा भाजपा लढणार असून, मंगलप्रभात […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नारायण राणेंच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब, किरण सामंतांची माघार, लढत ठरली

रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआतून नारायण राणे हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलंय. महायुतीतला हा तिढा सामंजस्यानं सुटला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार, याचा सस्पेन्स मात्र गेले काही दिवस सुरु होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपानं आपल्या गळाला […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

भगीरथ भालकेंचा पाठिंबा प्रणिती शिंदेंना, सोलापुरात राम सातपुतेंची वाट बिकट?

पंढरपूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत होते आहे. दोन्ही तरुण उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. यातच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानं, त्याचा फायदा आता प्रणिती शिंदे यांना होईल असं दिसतंय. प्रवेश करतानाच्या सभेत दादांच्या सांगण्यावरुन सातपुतेंना आमदार केलं. आता हे पार्सल बीडला पाठवायचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘…तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती’; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

सोलापूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहितीये. पण हेही दिवस जातील याची खात्री होती. आणि सुदैवाने ते दिवस गेले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ‘ असं धक्कादायक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोलापूर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

भाजपाला निवडणुकीत किती जागा मिळतील?, राहुल गांधींनी व्यक्त केला अंदाज, इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले?

गाझियाबाद – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वतीनं 400 पारचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशभरात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपा आणि एनडीएचे नेते कार्यरत असल्याचं दिसतं आहे. भाजपानं हा 400 पारचा नेरेटिव्ह सेट केलेला असताना, आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करताना दिसू लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्रातील लढाई भाजपा विरुद्ध वंचित अशीच’, प्रकाश आबंडेकरांचं कार्यकर्त्यांना काय पत्र?

मुंबई- राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असं कार्यकर्त्यांना सांगताना ही लढाई केवळ भाजपा विरुद्ध वंचित अशीच असल्याचं त्यांनी म्हटलय. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे झालेले आहेत.काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, अशात केवळ वंचितच सक्षमपणे […]