मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या 23 वरुन थेट 9 पर्यंत खाली घसरली होती. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.या पार्शवभूमीवर भाजप तयारीला लागला असून मुंबईत रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर. भाजप कोअर कमिटीची (BJP Core Committee) बैठक झाली .या बैठकीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. ही बैठक तब्बल पाच तास सुरु होती. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी ओबीसी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील भाजप कोअर कमिटीच्या बैठकिला पोहचले .रात्री आठ वाजता सुरु झालेली ही बैठक उत्तररात्री एक वाजेपर्यंत चालू होती .
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीतीबाबत चर्चा झाली . यासाठी भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. या ब्लू प्रिंटच्या आधारे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची निवड, प्रचार आणि रणनीती या गोष्टी निश्चित होतील. यासंदर्भात कोअर कमिटीची आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर प्राथमिक ब्लू प्रिंट निश्चित केली जाणार आहे . या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत नेमक्या कोणकोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “बैठकीत आमची विधानपरिषद आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून १० नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत पाठवली जाणार आहे असे त्यांनी सांगितले .. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्य उपस्थित होते.
दरम्यान महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले , लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटारडेपणा केला. त्यांनी आदिवासी महिला आणि जनतेला फसवलं. संविधान बदलले जाईल आसा खोटारडा प्रचार करून त्यांनी नॅरेटिव्ह पसरवून मते घेण्याचे काम केले. पण आता मोदी यांनी पंतप्रधानाची शपथ घेतली असून त्यांचा सगळा खोटारडेपणा बाहेर निघेल असं ते म्हणाले .