ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत 9 जागांवर अद्यापही तिढा, रामटेक, अमरावती कुणाकडे?, भाजपा प्रदेशाध्यक्षांनी काय सांगितलं?

मुंबई- महायुतीत अद्यापही नऊ जागांवर तिढा असल्याची कबुली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. भाजपाच्या केंद््रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होते आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल आणि हा तिढा लवकर संपेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. महायुतीत कोणत्या जागांवर तिढा? या नऊ जागांवर महायुतीत पेच असल्याचं सांगण्यात येतंय. अमरावती भाजपा लढवणार […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील महायुती आणि मविआचं जागावाटप कसं होणार? कोणत्या जागांवर उमेदवारांचा शोध?, कोणत्या जागांवर तिढा

मुंबई- लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आठवडा उलटून गेला, तरी महायुतीकडून मुंबईतील केवळ दोन उमेदवारांचं नाव जाहीर झालंय. तर मविआकडून मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. मुंबईतील सहा जागांवर दोन्ही बाजूंनी तिढा असल्याचं दिसतंय. मनसे महायुतीत येण्याच्या चर्चेनं या तिढ्यात आणखी भर पडलीय. सहा मतदारसंघात काय स्थिती? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महायुती आणि मविआचं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महाविकास आघाडीचं 44 जागांचं जागावाटप पूर्ण, या चार जागांवर तिढा कायम

मुंबई- महाविकास आघाडीचं 48 पैकी 44 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. यात आता वंचितचा समावेश मविआत नसेल हे स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित चार जागांचा निर्णय लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. या चार जागांत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या चार जागांवर तिढा सुटला नाही तर या चारही मतदारसंघात बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेला उमेदवारी दिल्यास भाजपला देशभर विरोध

उत्तरभारतीय विकाससेनेचा इशारा X: @ajaaysaroj मुंबई: राज ठाकरे यांची मनसे, भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महायुतीमध्ये येण्याची केवळ औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. मात्र त्याआधीच उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी, मनसेला भाजपने युतीमध्ये घेतल्यास मुंबईतील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार , […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

दोन राजेंच्या भूमिकेमुळं महायुती अडचणीत? सातारा-माढा लोकसभा मतदारसंघातल्या वादावर तोडगा कधी?

मुंबई – राज्यातील सातारा आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघात दोन राजांनी घेतलेल्या भूमिकेमुळं वाद निर्माण झालेला आहे. माढा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाीक निंबाळकर यांना रामराजे निंबाळकर यांनी जाहीर विरोध केलेला आहे. अजित पवार-फडणवीस यांनी केलेल्या शिष्ठाईच्या प्रयत्नांनंरही रामराजे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे साताऱ्यातून भाजपाचं तिकीट मिळावं या मागणीसाठी उदयनराजे भोसले हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

वाटाघाटी सुरु असताना सांगलीची उमेदवारी जाहीर करणं अयोग्य, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची ठाकरेंवर जाहीर टीका, काँग्रेसच्या उर्वरित उमेदवारांची आज घोषणा

मुंबई – महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा असतानाच काँग्रेसनं गुरुवारी रात्री राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सोलापुरातून प्रणिती शिंदे, नांदेडातून वसंतराव चव्हाण तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. आता उर्वरित उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची किती मर्यादा? कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्यावर किती खर्चाची परवानगी?

मुंबई – लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. काही जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता काही भागात प्रचारसही सुरु झालेला आहे. अशात निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची चर्चा रंगू लागलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत गेल्या काही निवडणुकांपेक्षा जास्त खर्च केला जाईल असंही छातीठोकपणे सांगण्यात येतंय. राज्यात बदललेली राजकीय समीकरणं, महायुती विरुद्ध मविआ […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

गाडीवर हल्ला करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आरोप

सोलापूर – राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यात सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेमकं काय घडलंय? प्र्णिती शिंदे गेल्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालीय. त्यात बारामती या लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील अनेक सदस्य घराबाहेर पडताना पाहायला मिळतायेत. अशात अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर बारामतीच्या खासदजार सुप्रिया सुळे यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS with Mahayuti : मनसेच्या महायुतीमधील एंट्रीला मुहूर्त सापडेना

X: @ajaaysaroj राज ठाकरे आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या हाय प्रोफाइल दिल्ली बैठकीला आता जवळपास ७२ तास उलटून गेले आहेत. महायुतीमधील (Mahayuti) डब्यांना आता मनसेचे इंजिन लागणार अशी चर्चा देशभर सुरू आहे. याच बैठकीचा पुढचा अध्याय म्हणून आज मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) […]